Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:12 PM2022-01-19T12:12:58+5:302022-01-19T12:37:49+5:30

देहूगाव पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली असून त्यांनी १४ जागांवर वर्चस्व मिळवले आहे

ncp one sided nagar panchayat election in dehugaon and only one candidate bjp | Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार

Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार

googlenewsNext

देहूगाव : देहूगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली असून त्यांनी १४ जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर अपक्ष दोन व भाजपा एक या पद्धतीने देहूगाव नगर पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पक्षीय बलाबल नवनिर्वाचित सभागृहामध्ये असणार आहे. आता मतदारांना पहिला नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. 

चौदा प्रभागांमध्ये राष्ट्रवादी 

प्रभाग क्रमांक १ मध्ये मीना कुराडे, प्रभाग क्रमांक २ मध्ये रसिका काळोखे, प्रभाग क्रमांक ३ मध्ये पूजा दिवटे, प्रभाग क्रमांक ४ मयूर शिवशरण, प्रभाग क्रमांक ६ मध्ये पुनम काळोखे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्मिता चव्हाण, प्रभाग क्रमांक १० मध्ये सुधीर काळोखे, प्रभाग क्रमांक ११ मध्ये पोर्णिमा परदेशी,  प्रभाग क्रमांक १२ मध्ये सपना मोरे, प्रभाग क्रमांक १३ मध्ये प्रियंका मोरे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रवीण काळोखे, प्रभाग क्रमांक १५ मध्ये आदित्य टिळेकर,  प्रभाग क्रमांक १६ मध्ये योगेश परंडवाल, प्रभाग क्रमांक १७  मध्ये ज्योती गोविंद टिळेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. 

दोन अपक्ष, एक भाजप 

प्रभाग क्रमांक ७ मध्ये योगेश काळोखे व प्रभाग क्रमांक ५ मध्ये शितल हगवणे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या पूजा काळोखे निवडून आल्या आहेत.   

Web Title: ncp one sided nagar panchayat election in dehugaon and only one candidate bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.