Corona Virus Pune: "माझ्या औषधांनं कोरोनातून बरे व्हाल", पुण्याच्या डॉक्टरचं आयुष मंत्रालयाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 12:20 PM2021-04-03T12:20:13+5:302021-04-03T19:17:54+5:30

आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त रुग्णांना दिले औषध

My medicine will cure corona '; Pune doctor's letter to the Ministry of Life | Corona Virus Pune: "माझ्या औषधांनं कोरोनातून बरे व्हाल", पुण्याच्या डॉक्टरचं आयुष मंत्रालयाला पत्र

Corona Virus Pune: "माझ्या औषधांनं कोरोनातून बरे व्हाल", पुण्याच्या डॉक्टरचं आयुष मंत्रालयाला पत्र

Next
ठळक मुद्देसर्व रुग्ण औषधातून बरे झाल्याचा दावा

पुणे: पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधले आहे. हे औषध कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा या डॉक्टरांनी केला आहे. पुण्यात कोथरुड मधील डॉ. सारंग फडके असं त्यांचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे डॉ. फडके हे गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत आहेत. ज्यानंतर हे रुग्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

डॉ. फडके म्हणाले, "आतापर्यंत मी १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिलंय. ज्याचा १००  टक्के सकारात्मक परिणाम झालाय. हे औषध कोरोना रोग समूळ नष्ट करतं. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयासोबत पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप केंद्राने त्यांची दखल घेतलेली नाही." 

डॉ. फडके यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. एका पत्राद्वारे या औषधाची दखल घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. या औषधाचे साइड इफेक्ट्स नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Web Title: My medicine will cure corona '; Pune doctor's letter to the Ministry of Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.