Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:36 PM2022-01-19T12:36:16+5:302022-01-19T12:36:25+5:30

भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

Murder of a youth by attacking him with a stone in pimpri chinchwad | Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून

Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून

googlenewsNext

पिंपरी : काही अज्ञातांनी दगड व धारदार हत्यारांनी वार करून तरुणाचा खून केला. गुळवेवस्ती, भोसरी येथे सोमवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिन्टू कुमार सहदेव शाह (वय २९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पाहणी केली. तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने मारून तसेच तोंडावर धारदार हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सुरवातीला तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यानंतर संबंधित मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचे निष्पन्न झाले. तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Murder of a youth by attacking him with a stone in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.