पुणे शहरातील'वनवैभव' टिकविण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय; टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:52 PM2021-07-19T19:52:32+5:302021-07-19T19:58:19+5:30

पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ५ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे एकूण २६ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध

Municipal Corporation's big decision to maintain 'forest hill' in Pune city; 26 crore for conservation of hills | पुणे शहरातील'वनवैभव' टिकविण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय; टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटी

पुणे शहरातील'वनवैभव' टिकविण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय; टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटी

Next
ठळक मुद्देसंयुक्त वन व्यवस्थापन योजनेंतर्गत होणार करार

पुणे : शहरातील टेकड्या आणि तेथील वन वैभव टिकविण्यासाठी नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजनेंतर्गत शहरातील भांबुर्डे आणि वारजे वनक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका, वन विभाग आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ५ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे एकूण २६ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध देण्यात आली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

याबाबत माहिती देताना रासने म्हणाले, वृक्ष संवर्धन समितीने १५ जूनच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली होती. पुणे शहर परिसरात सुमारे १ हजार ८२६ एकरचे वनक्षेत्र आहे. पहिल्या टप्प्यात पाचगाव-पर्वतीतील ६१३ एकर, भांबुर्डा वन विभागातील २५० एकर आणि वारज्यातील १२५ एकर अशा एकूण ९८८ एकर क्षेत्रावर वनसंवर्धनाचे काम सुरू झाले. दुस-या टप्प्यात पाचगाव-पर्वती, भांबुर्डा, वारजे या विभागांसह कोथरुड, धानोरी वनक्षेत्रात योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली होती. वनक्षेत्राला सुरक्षा भिंत बांधणे, वृक्षारोपण, रोपवाटीका, नालाबंडिंग, सुरक्षा रक्षक नेमणे अशा प्रकारची कामे करण्यात आल्याचे ते म्हणाले
===
केंद्र सरकारने १९८८ साली ग्रामीण भागात सुरु केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन योजनेच्या धर्तीवर पुणे शहरात २००६ मध्ये वन खाते, पुणे महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाला सुरूवात झाली. त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठण करण्यात आले होते.
===
योजनेवर झालेल्या खर्चाचा तपशील
वर्ष                        तरतूद                             खर्च
२००६ ते २०११      १० कोटी २३ लाख         ९ कोटी ६१ लाख
२०१४ ते २०१९      ४ कोटी ८० लाख           २ कोटी ३१ लाख

Web Title: Municipal Corporation's big decision to maintain 'forest hill' in Pune city; 26 crore for conservation of hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.