A miscarriage of women due to dowry and harassment | माहेरून पैसे न आणल्याने केला सुनेचा गर्भपात 
माहेरून पैसे न आणल्याने केला सुनेचा गर्भपात 

पुणे  :माहेरून चारचाकी गाडी आणावी म्ह्णून सुनेचा छळ करून तिचा गर्भपात केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बोरी इथे घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात पतीसह इतर चार नातेवाईकांचा समावेश आहे. 

याबाबत  पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी येथील या महिलेचा विवाह २ मे २०१३ रोजी सागर मरळे यांच्यासोबत झाला. त्यानंतर विवाहाच्या दीड वर्षानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. या सोबत चारचाकी गाडी घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावेत असा तगादाही लावण्यात येत होता.  त्याकरिता तिला उपाशी ठेवून मारहाण करण्यात येत होती. या विवाहितेची गर्भधारण झाल्यावर दोन महिन्यांनी सासरच्या व्यक्तींनी खासगी रुग्णालयात इच्छेविरोधात गर्भपात केला. अखेर तिने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पती सागर मरळे, सासरे भागवत मरळे, दिर दिपक मरळे, सासु मालन मरळे, जाऊ ज्योती मरळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजीवकुमार धोत्रे करत आहेत . 


Web Title: A miscarriage of women due to dowry and harassment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.