सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न'च करा : शरद पाेंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 01:26 PM2020-03-01T13:26:13+5:302020-03-01T13:31:32+5:30

सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची गरज नाही. सवारकर हे 'भारतरत्नच' आहेत, अशा शब्दात शरद पाेंक्षे यांनी सवारकरांचा गाैरव केला.

Mention Savarkar as 'Bharat Ratna': Sharad Pongshe rsg | सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न'च करा : शरद पाेंक्षे

सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न'च करा : शरद पाेंक्षे

googlenewsNext

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची वाट का पाहायची ? आचार्य अत्रे किंवा महात्मा गांधी या पदव्या काय सरकारने दिल्या आहेत का ? असा संतप्त सवाल उपस्थित करत, आजपासून सावरकरांचा उल्लेख हा 'भारतरत्न' म्हणून करा. सावरकरांना 'भारतरत्न' म्हणण्याने या पदवीचाच सन्मान हाेणार असल्याचे मत अभिनेते शरद पाेंक्षे यांनी व्यक्त केले. 

मी सवारकर एक अभिनव वक्तृत्व स्पर्धेच्या पारिताेषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन साेसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शरद कुंटे उपस्थित हाेते. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन साेसायटीच्यावतीने आयाेजित या कार्यक्रमास सावरकरप्रेमींनी गर्दी केली हाेती. 

सुरुवातीला शरद पाेंक्षे यांनी सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न' असा करताच सभागृहात टाळ्यांचा कडरकडाट झाला. कुणी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना त्यांना भारतरत्न देण्याची गरज नाही. सावरकर हे भारतरत्नच आहेत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. 'हिंदू' शब्दाची व्याख्या पाेंक्षे यांनी विस्तृतपणे विशद केली. सकाळी घराच्या दरवाज्यावर कुणे 'गर्व से कहाे हम हिंदू है' चा स्टिकर लावताे. मग आपली छाती जाज्वल्य अभिमानाने फुगते. असे का हाेते हिंदू शब्दाशी काय कनेक्शन आहे. धर्म ही नक्की भानगड काय इंग्रजीत 'रिलीजन' हा शब्द संकुचित आहे. जगात एकच धर्म आहे ताे म्हणजे 'हिंदू'. बाकी सगळ्या संस्था आहेत. हे हिंदू राष्ट्रच आहे यात सवालच नाही. जे बहुसंख्य असतात त्यांचा ताे देश असताे. हा देश हिंदूंचा आहे. हिंदूधर्मीय कट्टर हाेऊ शकत नाहीत. माणुसकी हा त्याचा धर्म असल्याचे सावरकर सांगतात. सावरकरांना सनातन हिंदू धर्म मान्य नाही. आपल्याला सावरकर समजून घ्यायला हवेत, असे त्यांनी सांगितले. 

'अहिंसा' हा शब्दच अस्तित्वात नाही. ताे अनैसर्गिक शब्द आहे. कुठली कृती केली तरी हिंसा घडणारच आहे. माेठा प्राणी छाेट्या प्राण्याला खाताे माणूस हा देखील प्राणीच आहे अशा शब्दात पाेंक्षे यांनी अहिंसा शब्दाची खिल्ली उडवली. 

नातवाला आजीचा इतिहासच माहित नाही
दिल्लीतील वेड्या मुलाला असचं बाेलत राहू दे. आजीने (इंदिरा गांधी) सावरकर स्मारकासाठी देणगी दिली हाेती. सावरकरांवर पाेस्टाचे तिकीट काढले हाेते. पण दुर्देव नातवाला आजीचा इतिहास माहित नाही, अशा शब्दात शरद पाेंक्षे यांनी राहुल गांधींना टाेला लगावला. 

Web Title: Mention Savarkar as 'Bharat Ratna': Sharad Pongshe rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.