ससून कोविड रुग्णालयात पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ७१० पदांची मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 07:16 PM2020-06-30T19:16:40+5:302020-06-30T19:23:44+5:30

ससूनमधील ११ मजली इमारतीमध्ये सध्या केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

Mega recruitment of 710 posts for the next six months at Sassoon covid Hospital | ससून कोविड रुग्णालयात पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ७१० पदांची मेगाभरती

ससून कोविड रुग्णालयात पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ७१० पदांची मेगाभरती

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वी रुग्णालयाने परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी आयसीयु तसेच विलगीकरण कक्षाची क्षमता टप्प्याटप्याने वाढविण्याचे काम सुरू

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने ससून रुग्णालयाच्या आवारातील ११ मजली कोविड रुग्णालयाची क्षमता वाढविली जात आहे. त्यासाठी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ७१० पदांची मेगाभरती केली जाणार आहे. त्यामध्ये विविध तांत्रिक पदांसह परिचारिका व चतुर्थश्रेणी पदांचाही समावेश आहे. ही सर्व पदे बाह्यस्त्रोता (आऊटसोर्सिंग) मार्फत भरली जाणार आहेत.
ससूनमधील ११ मजली इमारतीमध्ये सध्या केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या इमारतीमध्ये आयसीयु तसेच विलगीकरण कक्षाची क्षमता टप्प्याटप्याने वाढविण्याचे काम सुरू आहे. रुग्ण वाढल्याने रुग्णालयाला मनुष्यबळाची कमतरताही जाणवत आहे. त्याअनुषंगाने काही दिवसांपुर्वी रुग्णालयाने परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी घेतले होते. आता पुन्हा या पदांसह काही तांत्रिक पदेही भरली जाणार आहे. आऊटसोर्सिंगद्वारे ही पदे भरली जाणार असल्याने त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकुण ७१० पदे असून त्यामध्ये २७२ पदे तांत्रिक गटातील आहे. यामध्ये आयसीयु, डायलेसीस, रक्तपेढी, प्रयोगशाळा, इसीजी, क्ष-किरण, आॅक्सिजन तंत्रज्ञ वैद्यकीय सामाजिक अधिक्षक आदी पदांचा समावेश आहे. तर परिचारिकांची २१३ पदे भरली जाणार आहेत. आयुसीयु कक्षाची साफसफाई, यंत्रासामुग्री हाताळण्यासाठी १०३ कक्षसेवक आणि इमारतीच्या साफसफाईसाठी १०८ सफाई कर्मचारी आदी एकुण २२५ पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहेत, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
------------
कोविड रुग्णालय क्षमता
नवीन आयसोलेशन बेड - १००
सध्या - १४७ (४७ संशयित रुग्णांसाठी)
नवीन आयसीयु बेड - ८० (पहिल्या टप्प्यात ५०)
सध्या - ४०
सध्या व्हेंटिलेटर - २८
--------------   

Web Title: Mega recruitment of 710 posts for the next six months at Sassoon covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.