‘अडीच लाखांत कोर्टाचा निकाल करते मॅनेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:11 AM2021-01-15T04:11:13+5:302021-01-15T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वडगाव मावळ न्यायालयात प्रलंबित खटल्याचा निकाल ‘मॅनेज’ करुन निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी अडीच ...

‘Manage court verdicts for Rs 2.5 lakh’ | ‘अडीच लाखांत कोर्टाचा निकाल करते मॅनेज’

‘अडीच लाखांत कोर्टाचा निकाल करते मॅनेज’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वडगाव मावळ न्यायालयात प्रलंबित खटल्याचा निकाल ‘मॅनेज’ करुन निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा खटला वडगाव मावळ न्यायालयात प्रलंबित आहे. हा खटला ‘मॅनेज’ करुन त्याचा हवा तसा निकाल लावण्यासाठी तिने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.

गायकवाड यांनी त्या न्यायालयात काम करीत असल्याचे तक्रारदाराला सांगितले होते. तसेच वडगाव मावळ न्यायालयातील नाझरच्या कार्यालयात ही महिला तक्रारदाराला दिसली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची ८ व ९ जानेवारी रोजी पडताळणी केली. त्यानंतर तिने पैसे देण्यासाठी १३ जानेवारीला आधी तळेगावला बोलावले. त्यानंतर बुधवारी दुपारी किवळे पुलाखाली बोलविले. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला.

तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारताना गायकवाड हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्याविरुद्ध देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभावरी गायकवाड हिला गुरुवारी (दि. १४) विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहे.

Web Title: ‘Manage court verdicts for Rs 2.5 lakh’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.