आंबेगाव खुर्द येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्याला अंबेजोगाईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:10 PM2020-12-19T12:10:22+5:302020-12-19T12:11:05+5:30

फिर्यादी व आरोपी यांची किरकोळ कारणातून भांडणे झाली होती.

Man arrested from ambejogai for firing case at Ambegaon Khurd | आंबेगाव खुर्द येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्याला अंबेजोगाईतून अटक

आंबेगाव खुर्द येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्याला अंबेजोगाईतून अटक

googlenewsNext

धनकवडी : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्यास अंबेजोगाई शहरातून जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलिस यशस्वी झाले. संबंधित आरोपी तडीपार असताना त्याने तडीपारीचा भंग करुन गुन्हा केला होता. कृष्णा बबन लोखंडे रा. शनिनगर, असे अटक आरोपीचे नाव आहे. 

आंबेगाव खुर्द येथे ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री हनुमाननगर परिसरात घडली होती. यावेळी दोन ते तीन गोळ्यांचे राऊंड फायर करण्यात आले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सोळा ते सतरा जणांच्या टोळक्‍या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, सिद्दीक मौला शेख, (वय.१८, रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख व आरोपी गणेश पवार यांची किरकोळ कारणातून भांडणे झाली होती. याच रागातून पवार याने शेख याच्यावर त्याच्याकडील बंदूकीतून दोन ते तीन गोळ्या फायर केल्या. तसेच त्याचे साथीदार विशाल सोमवंशी, विनोद सोमवंशी, कृष्णा लोखंडे यांच्यासह इतरांनी फिर्यादीच्या दिशेने दगडफेक करून त्यांचे मित्र अमीर शेख, अली खान, नौशल शेख, समील शेख, यांना लाथाबुक्‍यांने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली होती. 

दरम्यान याप्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, विक्रम सावंत व सचिन पवार यांना आरोपी लोखंडे हा बीडमधील आंबेजोगाई मध्ये लपल्याची खबर मिळाली. मिळालेल्या खबरीनुसार तपास पथकाने त्याला आंबेजोगाईत जाऊन जेरबंद केले. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रविंद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांनी केली.

Web Title: Man arrested from ambejogai for firing case at Ambegaon Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.