Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:31 AM2019-09-19T04:31:01+5:302019-09-19T04:31:17+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला ‘धर्मनिरपेक्ष’तेची कात्री लावली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - Sharad Pawar plays the role of 'soft Hindutva' | Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल

Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल

Next

पुणे : काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन पक्ष ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा स्वीकार करीत असल्याचे दर्शविले होते. परंतु, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पुतण्याच्या ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला काकांनी कात्री देत अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला ‘धर्मनिरपेक्ष’तेची कात्री लावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामधून बरेचसे नेते आणि कार्यकर्ते भाजपा-सेनेमध्ये प्रवेश करू लागले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यभरामध्ये भाजपा-सेनेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी तसेच जनसंवादासाठी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढली. या यात्रेदरम्यान, अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा ध्वजही लावण्यात येईल. भगवा ध्वज ही भाजपा-सेनेची मक्तेदारी नाही, अशी भूमिका मांडली होती.
सत्ताधारी पक्षांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका, २०१४ सालच्या विधानसभा आणि लोकसभा तसेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश पाहता बहुसंख्यांकांमधील मते वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाऊ लागले होते. मराठा समाजही पक्षापासून दुरावल्याची जाणीव झाल्याने या समाजाला आकर्षित करण्यासाठी भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा अंगीकार करण्यात आला. परंतु, त्याच वेळी राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष आणि जात-पात विरहीत राजकारण करणारा पक्ष असतानाही एका विशिष्ट रंगाचा झेंडा लावण्याचा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांना पडला होता. राष्ट्रवादीमध्ये विविध समाजांचे ‘सेल’ असून प्रत्येक समाजाचा वेगळ्या रंगाचा झेंडा आहे. याविषयी पक्षांतर्गत सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सुरु होत्या.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असून पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले आहे. पवार यांनी पक्षाच्या आणि स्वत:च्या धर्मनिरपेक्ष ‘इमेज’ला धक्का लागणार नाही याची काळजी हे वक्तव्य करताना घेतली. पक्षांतर्गतच भूमिकांविषयी एकमत नसेल तर कार्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या भूमिका घ्यायच्या याविषयी संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. पक्षाला पडझडीच्या या काळात हे परवडणारे नक्कीच नाही.
>शरद पवार यांनी भगवा ध्वज न लावण्याची घेतलेली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून पवार साहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेविषयी सर्वांना कल्पना आहे.
- अंकुश काकडे, प्रवक्ते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - Sharad Pawar plays the role of 'soft Hindutva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.