राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 05:49 PM2021-01-18T17:49:51+5:302021-01-18T17:51:05+5:30

ऐनवेळी काहींनी दगाफटका करत राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपला गड राखता आला नाही.

Maharashtra Gram Panchayat Election Results : NCP's push to 'BJP'! Change of power in Sangvi Gram Panchayat after 20 years | राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन

राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन

googlenewsNext

बारामती: बारामती तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या सांगवी ग्रामपंचायतवर २० वर्षांनंतर परिवर्तन होऊन भाजपचा राष्ट्रवादीने पराभव करून मोठ्या ताकदीने आपले वर्चस्व आणून बाजी मारली आहे. जेष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या गटाकडे असलेली ग्रामपंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. वार्ड क्रमांक १ व वार्ड क्रमांक २ मधून सर्व उमेदवार राष्ट्रवादीने निवडून आणले असून भाजपने वार्ड क्रमांक ४ वर आपले वर्चस्व ठेऊन तिन्ही उमेदवार निवडून आणले आहेत. राष्ट्रवादीने १५ पैकी आपले १० उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून आणून भाजपला मोठा धक्का दिला आहे.

जेष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची माळेगाव साखर कारखान्याची सत्ता हातून जाऊन राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठेवले होते. त्याचबरोबर आता चंद्रराव तावरे यांची गावची सत्ता देखील हातून गेली असून राष्ट्रवादीने सत्ता प्रस्तापित करून आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे. सांगवीत काही प्रभागात दुरुंगी, तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत पहायला मिळाली. दोन्ही गटात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली.
 
ऐनवेळी काहींनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपचा पराभव होऊन चंद्रराव तावरे यांना आपला गड राखता आला नाही. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचा श्री भैरवनाथ पेनेल व राष्ट्रवादीचे प्रकाश तावरे, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक अनिल तावरे पाटील, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त महेश तावरे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष किरण तावरे यांचा श्री भैरवनाथ ग्रामविकास पेनेल यांच्यात लढत होती. यामध्ये राष्ट्रवादीचे १० उमेदवार निवडून आले आहेत, तर  भाजपचे ५ उमेदवार निवडून आले असून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

प्रभाग क्रमांक १ मधून इतर मागास प्रवर्ग-पुरुष राष्ट्रवादीचे अनिल विठ्ठल काळे यांना ७६७ मते मिळाली असून विजय झाला आहे, भाजपच्या
सुर्यकांत सयाजी काळे यांचा पराभव होऊन त्यांना ३९९ मते मिळाली आहेत. तर अनुसूचित जाती-महिला मधून भाजपच्या दिपाली संतोष शिंदे यांना ४९३ मते मिळाली असून त्या पराभूत झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या पौर्णिमा अरुण लोंढे यांना ६७६ मते मिळून त्या विजयी झाल्या आहेत. सर्वसाधारण-महिला मधून भाजपच्या अलका मच्छिंद्र तावरे यांचा पराभव होत ५०० मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीच्या छाया हनुमंत तावरे यांना ५७९ मते मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे. तर अपक्ष उमेदावर सिमा महेंद्र तावरे यांना १०० मते मिळून पराभव झाला आहे.

तर प्रभाग क्रमांक २ मधून इतर मागास प्रवर्ग-महिला राष्ट्रवादीच्या कमल बापूराव गायकवाड यांना ५२५ मते मिळाली असून त्यांचा विजय प्राप्त झाला आहे. तर भाजपच्या उज्वला दत्तात्रय शिपकुले यांना ४५३ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. सर्वसाधारण-महिला मधून राष्ट्रवादीच्या निलिमा सुधाकर जगताप यांना ४८४ मते मिळाली असून अपक्ष उमेदवार शितल स्वप्निल जगताप यांना १५० मते तर भाजपच्या रुपाली राजेंद्र तावरे यांना ३४६ मते मिळाली असून नीलिमा जगताप यांनी दोघींचा पराभव केला आहे. तर सर्वसाधारण-पुरुष मधून भाजपच्या दत्तात्रय बबन चव्हाण यांना ४३४ मते मिळाली त्यांचा राष्ट्रवादीच्या चंद्रकांत निवृत्ती तावरे यांनी ५४७ मते मिळवून पराभव केला आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधून इतर मागास प्रवर्ग-महिला मधून राष्ट्रवादीच्या प्राजक्ता शिवाजी एजगर यांना ५२४ मते मिळाली असून, त्यांचा भाजपच्या विठाबाई हनुमंत एजगर यांनी ५३८ मते मिळवत पराभव केला आहे. तर सर्वसाधारण-महिला मधून राष्ट्रवादीच्या पुष्पलता प्रकाश झोरे यांना ४९२ मते मिळाली असून त्यांचा भाजपच्या स्वाती मच्छिंद्र वाघ यांनी ५६९ मते मिळवत पराभव केला आहे.तर सर्वसाधारण-पुरुष मधून भाजपचे अमोल अशोक तावरे यांना ४८५ मते मिळाली आहेत,तर अपक्ष उमेदवार धनंजय हनुमंत तावरे यांना ५३ मते मिळाली आहेत,तर राष्ट्रवादीचे विजय श्रीरंगराव तावरे यांनी ५२९ मते मिळवत दोघांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ४ मधून अनुसूचित जाती-पुरुष मधून राष्ट्रवादीचे आनंदा संभाजी जगताप यांना ४६३ मते मिळाली असून त्यांचा पराभव करत भाजपचे सिद्धार्थ भानुदास जगताप यांनी ४८२ मते मिळवत विजयी झाले आहेत,तर सर्वसाधारण-महिला मधून भाजपच्या अनिता हनुमंत तावरे यांनी ४९२ मते मिळवत राष्ट्रवादीच्या लैला अयुब शेख यांना ४५४ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. तर सर्वसाधारण-पुरुष मधून भाजपचे अनिल पद्मसिंह तावरे यांनी ४७० मते मिळवत राष्ट्रवादीचे महेश अशोक तावरे यांना ४३६ तर अपक्ष उमेदवार महेंद्र जयसिंग तावरे यांना ४७ मते मिळाली असून दोघांचा पराभव केला आहे.

प्रभाग क्रमांक ५ मधून इतर मागास प्रवर्ग-पुरुष भाजपचे रणजित तात्या ननवरे यांना २५८ मिळाली असून पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीचे विलास नथुराम आडके यांना ५४५ मते मिळाली असून त्यांनी विजय प्राप्त केला आहे. तर सर्वसाधारण-महिला भाजपच्या अश्विनी गोविंद तावरे यांना ३४० मते मिळाली पराभव होत राष्ट्रवादीच्या स्वाती सुधीर तावरे यांना ४७४ मते मिळून विजयी झाल्या आहेत.

सर्वसाधारण-पुरुष मधून भाजपचे जालिंदर उत्तम तावरे यांना २१८ मते मिळाली असून, अपक्ष उमेदवार महेंद्र जयसिंग तावरे यांना २१ मते तर अपक्ष उमेदवार सुनील उदयसिंह तावरे यांना ०४ मते मिळाली असून राष्ट्रवादीचे सर्वात तरुण उमेदवार प्रणव रविंद्र तावरे यांनी ५७२ उच्चांकी मते घेऊन वरील तिघांचा पराभव केला आहे.

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : NCP's push to 'BJP'! Change of power in Sangvi Gram Panchayat after 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.