Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:10 PM2019-10-15T13:10:49+5:302019-10-15T13:12:28+5:30

हडपसरला भेडसावत असलेल्या वाहतूककोंडी निर्माण करणारे काँग्रेस व राष्ट्रवादी आहे ..

Maharashtra Election 2019 : Traffic Transport problem by Selfish Politics in the hadapsar : Yogesh Tilekar | Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

googlenewsNext

हडपसर : पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दोन मोठ्या टाऊनशिप आणल्या. पण त्यामानाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली नाही. भविष्यातील निर्माण होणाऱ्या  समस्यांचा विचार केला गेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने हडपसरकरांवर नित्याची  वाहतूककोंडी  लादली असल्याचा  आरोप महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी केला आहे.  महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी साडेसतरानळी  परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. या वेळी  मतदारांशी टिळेकर यांनी संवाद साधला. या वेळी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.
 हडपसरला भेडसावत असलेल्या वाहतूककोंडी निर्माण करणारे काँग्रेस व राष्ट्रवादी आहे. लोकसंख्या वाढली परंतु त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत.  त्यांच्या या कामामुळेच या परिसरात वाहतूककोंडी सततची असते. त्यांच्यावर प्रभावी उपाय म्हणून कोरेगाव पार्कपासून मांजरी गावठाण पर्यंत रस्ता चौपदरीकरण केला.  दोन मोठ्या अंडरपास प्रस्तावित केल्या आहेत. दोन मोठ्या टाऊनशिपमधील रस्ता रुंदीकरण कोणामुळे रखडला याचा जाब नागरिकांनी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना विचारावा. असे सांगून टिळेकर म्हणाले की,  लवकरच हा रस्ता वाढून उड्डाणपुलासाठी सर्व्हे करण्यात येईल व अंडरपास निर्माण केला जाणार आहे. हडपसरला मेट्रो आणणार आहे. वाडगाव कात्रज कोंढवा उंड्री वडकी थेऊर लोणीकंद  ४२ किलो मीटरचा ५८८ हा नवीन राष्ट्रीय महामार्ग  होत आहे. कात्रज कोंढवा रस्त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे. कात्रजच्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून सहा पदरी उड्डाणपूल होणार आहे. ससाणेनगर सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग, मुंढवा, घोरपडी, मांजरी येथील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे  वाहतुकीविषयी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला  टिळेकर यांनी उत्तर दिले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Traffic Transport problem by Selfish Politics in the hadapsar : Yogesh Tilekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.