Maharashtra Election 2019 : शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:48 PM2019-10-19T12:48:04+5:302019-10-19T12:48:40+5:30

Maharashtra Election 2019 : आगामी ५ वर्षे ही हडपसरच्या प्रगतीची, स्थैर्याची , स्वछ कारभाराची, गतिमान पद्धतीने प्रगतीची असतील, असे मी वाचन देतो...

Maharashtra Election 2019 : Sharad Pawar's faith will prove worthwhile | Maharashtra Election 2019 : शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविणार

Maharashtra Election 2019 : शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविणार

Next
ठळक मुद्देसामाजिक, धार्मिक गरजांकडे लक्ष द्यायला हवे

भूमिका - हडपसर मतदारसंघ 

- चेतन तुपे
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे.  तो मी सार्थ ठरविण्यासाठी निकराचे प्रयत्न करणार आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी ही लढाई लढण्यास सज्ज झालो आहे. हडपसरवासीय या लढाईत मला नक्की साथ देतील. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस- कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
तुपे म्हणाले, सर्वांगीण विचार करून हडपसरचा एक मोबिलिटी  प्लॅन आणावा लागेल. त्या प्लॅनमध्ये सर्वच विचार करावा लागेल. यामध्ये फसलेली बीआरटी आहे. याचा विचार करावा लागेल. शेवाळवाडीवरून स्वारगेटला मेट्रो नेली पाहिजे.  त्यासाठी माझे प्रयन्त असतील. २४/७ पाणीपुरवठ्याची घोषणा झाली.  आम्ही टाक्यांची कामे सुरू केली, पण पाईपलाईन, त्याचे  जाळे कोठे  आहे?  हडपसरला पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. आमच्या माता भगिनींचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येक मोठ्या सोसायटीत मोठ्या संख्येने टँकरने पाणीपुरवठा होतो.  हडपसरकारांना  पाणी मिळत नाही. पुण्यात दोन वेळा पाणी मिळते; पण हडपसरमध्ये २ तास पण  पाणी मिळत नाही. हा दुजाभाव का? मी या प्रश्नासाठी भांडत आहे. जोपर्यंत सगळ्या सोसायटीतील टॅँका बंद होत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष माझा सुरू राहील.
हरित हडपसरची संकल्पना मांडत असल्याचे सांगून तुपे म्हणाले, पर्यावरणाचा नाश झाला आहे.  सगळ्या टेकड्यांवर झाडे लावून हडपसर हरित करता येईल. पुढील पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी व सुरक्षित घडवण्यासाठी मी हरित हडपसर करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. पुणे शहरातील सर्वात प्रदूषित भाग म्हणून हडपसर, कात्रज, मांजरी  ओळखला जातो. याची कारणे आहेत.  वाहतुकीची समस्या आणि संपूर्ण पुणे शहराचा कचरा हडपसरकरांच्या माथी आणून मारला आहे. येथेच  सगळे प्रकल्प येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही महापालिकेत  आवाज उठवला आहे. दुर्दैवाने  राज्य सरकारकडे जो आवाज उठवला पाहिजे होतो तो उठवला गेला नाही. त्याच्यामुळे या प्रश्नावर काम करावे लागेल. मला संधी दिल्यास कचरा प्रकल्प सगळीकडे जातील. हडपसरमध्ये फक्त हडपसरकारांच्या कचºयासाठीच प्रकल्प राहील.तुपे म्हणाले, की हडपसरची  प्रगती कोठेतरी थांबली आहे. हा  आलेख उंचवण्यासाठी माझा प्रयन्त राहील. आगामी ५ वर्षे ही हडपसरच्या प्रगतीची, स्थैर्याची , स्वछ कारभाराची, गतिमान पद्धतीने प्रगतीची असतील, असे मी वाचन देतो. पाच वर्षांचा हिशोब धरला तर १० कोटींची कामे होणे अपेक्षित आहे.  यापैकी १.६० कोटींचा निधी वापराविना पडून राहिल्याने परत गेल्याची नामुष्की ओढविली आहे. 
.........
सामाजिक, धार्मिक गरजांकडे लक्ष द्यायला हवे
आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक समुदायाचे, जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. हडपसरचाही चेहरा बदलला आहे. हडपसरमध्ये अनेक लोक कामानिमित्त व्यवसायाच्यानिमित्ताने या ठिकाणी राहत आहेत. प्रत्येक समाजाला त्यांच्या त्यांच्या गरजा ओळखून त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या सांस्कृतिक गरजा असतील. सामाजिक, धार्मिक गरजांकडे लक्ष दिले पाहिजे. मंदिराचे जीर्णोद्धार केले आहेत. तसेच दर्गाही बांधले आहेत. अजित पवार यांच्या हस्ते कोंढव्यात हज हाऊसचे उद्घाटन झाल. पण हज हाऊसकामात काही अडथळे येत आहेत. मला आमदार  म्हणून संधी दिल्यास असे येणार अडथळे एका वर्षात दूर करेन.- चेतन तुपे

Web Title: Maharashtra Election 2019 : Sharad Pawar's faith will prove worthwhile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.