Maharashtra Election 2019 : NCP's rebel Apapaheb Jagdale supports to Harshvardhan Patil | Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीचे बंडखोर आप्पासाहेब जगदाळे यांचा हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा
Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीचे बंडखोर आप्पासाहेब जगदाळे यांचा हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा

ठळक मुद्देआमदार दत्तात्रय भरणे व आप्पासाहेब जगदाळे यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष तीव्र

कळस : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आप्पासाहेब जगदाळे व  समर्थकांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पक्षप्रवेश नकरता पाठिंबा जाहीर केला आहे.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून इंदापुरच्या जागेवरुन मतभेद होते. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. मात्र, पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरुन स्पर्धा निर्माण झाली होती. विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, बाजार समितीचे सभापती वपुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह७ जणांनीपक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पक्षश्रेष्ठींची पसंती दत्तात्रय भरणे यांच्या नावाला कायम राहिल्याने सभापती जगदाळे व समर्थकांनी वेगळा मेळावा घेऊन आमदार भरणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.  मात्र पक्षाने भरणे यांनाच उमेदवारी दिली.  त्यामुळे जगदाळे व समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र, सोमवारी (दि. ७) दुपारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवशीत्यांनी आपला पाठिंबा हर्षवर्धन पाटील यांना जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान आप्पासाहेब जगदाळे यांनी २००९ साली हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आतापर्यंत कायमच मामा-भाच्यांमध्ये राजकिय कलगीतुरा रंगत होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत
आमदार दत्तात्रय भरणे व आप्पासाहेब जगदाळे यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला. परिणामी राष्ट्रवादीमध्ये राहूनच आप्पासाहेब जगदाळे यांनी आपले भाचे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी समर्थक छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्षबाळासाहेब घोलप, अशोक घोगरे, संजय निंबाळकर उपस्थित होते.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर म्हणाले,पक्षविरोधी कारवाया केल्या असतील तर त्याची खात्री करण्यात येईल.पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा असताना त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकारी जात असतील तर ही गंभीर बाब आहे. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने संबंंधितांची हाकलपट्टी करण्यात येईल. 

Web Title: Maharashtra Election 2019 : NCP's rebel Apapaheb Jagdale supports to Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.