Maharashtra election 2019 :MNS Kasba peth candidate start playing cricket between rally | ..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ)
..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ)

पुणे : कसबा पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीला उभा असणारा हा उमेदवार प्रचार करता करता थेट बॅटिंगला उभा राहिला आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातून लोकांमध्ये थेट मिसळत असल्याचा संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. 

  याबाबत अधिक माहिती अशी की, मनसेने  कसबा पेठेतून अजय शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिंदे यांना सुरुवातीपासून क्रिकेटची आवड आहे. ते नियमित मॅचेस तर बघतातच पण प्रत्यक्ष खेळायलाही उतरतात. दोन दिवसांपूर्वी कसब्यातील नारायण पेठेत त्यांची प्रचार फेरी सुरु होती. त्यावेळी आजूबाजूची मुलं क्रिकेट खेळत होती.त्यावेळी अचानक शिंदे थांबले यांनी त्यांनी काही वेळ क्रिकेटचा आनंद घेतला. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ काही कार्यकर्त्यांनी शेअर केला आहे.

कसब्यात शिंदे यांच्यासमोर महायुतीतर्फे महापौर मुक्ता टिळक आणि महाआघाडीतर्फे अरविंद शिंदे यांचे आव्हान आहे. यापूर्वी खासदार गिरीश बापट यांचा हा पारंपरिक मतदारसंघ होता. आता बापट खासदार झाल्यावर कसब्याच्या आमदारकीविषयी संपूर्ण शहरात उत्सुकता आहे. 

Web Title: Maharashtra election 2019 :MNS Kasba peth candidate start playing cricket between rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.