Maharashtra Election 2019 : अखेर भाजपने केले राजी , पुणे शहर रिपाइं होणार प्रचारात सक्रिय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:14 PM2019-10-12T12:14:23+5:302019-10-12T12:22:57+5:30

‘आम्हाला फसवले’ अशी टीका करून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारापासून पुण्यात फटकून राहिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) अखेर शहर शाखेने मनवले

Maharashtra Election 2019 : Finally, Pune city RPI will be active in campaigning of bjp | Maharashtra Election 2019 : अखेर भाजपने केले राजी , पुणे शहर रिपाइं होणार प्रचारात सक्रिय 

Maharashtra Election 2019 : अखेर भाजपने केले राजी , पुणे शहर रिपाइं होणार प्रचारात सक्रिय 

googlenewsNext
ठळक मुद्देकोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणारपालिकेच्या येत्या निवडणुकीत १५ जागा व अन्य काही आश्वासने

पुणे : ‘आम्हाला फसवले’ अशी टीका करून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारापासून पुण्यात फटकून राहिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) अखेर भाजपच्या शहर शाखेने मनवले. पालिकेच्या येत्या निवडणुकीत १५ जागा व अन्य काही आश्वासनांवर विसंबून रिपाइंने प्रचारात सक्रिय होण्याचे जाहीर केले. 
भाजप तसेच रिपाइंच्या वतीने संयुक्तपणे ही माहिती देण्यात आली. भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे तसेच उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर हे रिपाइंचे व उज्ज्वल केसकर हे भाजपचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 
मिसाळ म्हणाल्या, इतक्या मोठ्या पक्षाने एकही जागा मिळाली नसताना नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याची दखल घेऊन खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यात पालिकेच्या अडीच वर्षांनंतर होणाºया निवडणुकीत १५ जागा, कोरेगाव भीमा दंगलीतील गुन्हे मागे घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील स्मारकासाठी ६ एकर जागा उपलब्ध करून द्यावी या मागण्यांचा समावेश आहे.रिपाइंचे शहराध्यक्ष शिरोळे म्हणाले, गेली सलग १२ वर्षे आम्ही भाजपबरोबर आहे. 
मान्य केले त्यापैकी बरेच काही दिले नाही, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होते. त्याची दखल घेणे गरजेचे होते. विश्वासात घेतले जात नाही अशी त्यांची तक्रार होती. खासदार बापट यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत आमच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या. पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांनीही प्रचारात भाग घेण्याचे आदेश दिला. 
कार्यकर्त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यांच्या संमतीवरून आता रिपाइं प्रचारात सहभागी होणार आहे. पक्षाचे प्रत्येक मतदारसंघात हक्काचे असे एकगठ्ठा मतदान आहे. ते भाजपला मिळावेयासाठी रिपाइंचे कार्यकर्ते आता काम करतील.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन रिपाइंसाठी पुण्यात पालिकेला १५ जागा देण्याचे स्पष्ट आश्वासन भाजपने दिले आहे. त्यावर विश्वास ठेवून प्रचार करणार आहोत.
............

घटक पक्ष नाराज नाहीत
मिसाळ यांना शिवसेनेच्या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी, माझ्या मतदारसंघात सर्व शिवसैनिक काम करत आहेत असे सांगितले. अन्य मतदारसंघांत चौकशी करून तेथील शिवसैनिकांनाही सक्रिय करण्यात येईल. घटक पक्षांना आदराने वागवण्याची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे कोणताही घटक पक्ष नाराज नाही, पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय आहेत, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Maharashtra Election 2019 : Finally, Pune city RPI will be active in campaigning of bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.