Maharashtra Budget 2021: What exactly did Pune get in the state budget? | Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं ? जाणून घ्या... 

Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं ? जाणून घ्या... 

पुणे : कोरोनाकाळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशावेळी अर्थसंकल्पात मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.तसेच कोरोना संकटानंतरच्या पहिल्या अधिवेशनात जनतेला नेमका कसा दिलासा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. मात्र, विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात पुणे शहराला नेमकं काय मिळाले आहेत ते जाणून घेऊयात.  

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी पवार यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादनही केलं. या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग, कृषी, महिला,एसटी, रेल्वे, जलसंपदा विभाग, एमपीएससी, धरणे, महामार्ग, यांसह विविध प्रकल्पांबाबत मोठ्या घोषणा करतानाच अनेक योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात 3 लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. तसेच कोरोनाकाळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचे काम कृषी क्षेत्राने केले असेही त्यांनी सांगितले. 
 
अर्थसंकल्पात पुण्याला काय मिळालं..?  
१ - पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. 
२ - पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर. 
३ - ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर.
४- पुण्यातील साखर संकुलात साखर संग्रहालय उभारणार
५ - पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, जेजुरी,  नीरा नरसिंगपूर यांसह सात पुरातन मंदिरांचा विकास होणार 

६ - पिंपरी चिंचवड येथील मेट्रो प्रकल्पासाठी निधी 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Budget 2021: What exactly did Pune get in the state budget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.