लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:19 PM2020-08-13T13:19:30+5:302020-08-13T13:22:45+5:30

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पावणे दहा कोटींचा निधी केला वितरित 

Lok Sabha elections credit expansion will now clear; almost 10 crore ammount transfered | लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा

लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा

Next
ठळक मुद्देखासगी पुरवठादारांच्या देयकामधुन जीएसटी व टीडीएस कपात करणे बंधनकारक

पुणे : राज्यात सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंडप, निवडणूक साहित्य, कर्मचाऱ्यांचे जेवण, संगणकसह विविध प्रकारचा लाखो रुपयांच्या खर्चाची केलेली उधारी, उसणवारीवर अखेर मिटणार आहे. यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (दि.12) रोजी हा उधारीवर केलेल्या खर्चाची रक्कम देण्यासाठी तब्बल 9 कोटी 71 लाख रुपयांचा निधी सर्व तहसिलदार यांच्याकडे वर्ग केला. 
राज्यात सन 2019 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन निवडणुका पार पडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विविध सूचना व त्याची अंमलबजावणीमुळे निवडणूक खर्चात खूप मोठी वाढ झाली. परंतु निवडणूक काळात आयोग अथवा शासनाकडून प्रशासनाला पुरेसा निधी कधीच दिला जात नाही. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांना बहुतेक सर्व खर्च उधारी, उसनवारी करून पूर्ण करावा लागतो. परंतु निवडणूक होऊन वर्ष लोटले तरी निधी मिळत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. उधारीवर काम केलेले लोक आता पैसे मिळण्यासाठी मागे लागले आहेत. आता निधी मिळाल्याने उधारी देणे अधिकाऱ्यांना शक्य होणार आहे.
हा निधी खर्च करताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी उपलब्ध अनुदानातुन खासगी पुरवठादारांचे देयके प्रथम प्राधान्याने अदा करण्यात यावे, त्यानंतर अतिकालीक भत्ता अदा करतांना वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 व वर्ग 1 अनुक्रमाने अदा करणेची दक्षता घ्यावी. ही खर्चाची रक्कम अदा करताना येणाऱ्या रोख स्वरुपात न देता आरटीजीएस व्दारे अदा करणेत यावे. कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कमा अदा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी व खाजगी पुरवठादारांच्या देयकामधुन जीएसटी व टीडीएस कपात करणे बंधनकारक केले आहे. 


मतदारसंघ क्रमांक व नाव मजुर निधी 
१९५ जुन्नर 18 लाख
१९६ आंबेगाव 53 लाख 20 हजार
१९७ खेड 50 लाख 30 हजार
१९८ शिरुर 59 लाख 40 हजार
१९९ दौंड 33 लाख 90 हजार
२०० इंदापूर 34 लाख 60 हजार
२०१ बारामती 39 लाख 40 हजार
२०२ पुरंदर 28 लाख 60 हजार 
२०३ भोर 24 लाख
२०३ वेल्हे 13 लाख
२०३ मुळशी 42 लाख
२०४ मावळ 52 लाख 
२०५ चिंचवड 46 लाख 70 हजार
२०६ पिंपरी 63 लाख 90 हजार 
२०७ भोसरी 53 लाख 90 हजार
208 वडगावशेरी 51 लाख 50 हजार
209 शिवाजीनगर 40 लाख 20 हजार
210 कोथरूड 33 लाख 30 हजार
211 खडकवासला 83 लाख 50 हजार
212 पर्वती 33 लाख 40 हजार 
213 हडपसर 44 लाख 20 हजार 
214 पुणे कॅन्टोंन्मेंट 35 लाख
215 कसबा 35 लाख

Web Title: Lok Sabha elections credit expansion will now clear; almost 10 crore ammount transfered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.