पुणेकरांना दिलासा! कोरोनापूर्व वर्षांच्या तुलनेत या दिवाळीत कमी ध्वनी प्रदूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:55 PM2021-11-08T14:55:51+5:302021-11-08T15:00:18+5:30

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ध्वनी प्रदुषणात घट झाल्याची माहिती दिली (pune noise pollution during diwali, noise pollution in pune)

less noise pollution 2021 diwali as compared to pre corona years | पुणेकरांना दिलासा! कोरोनापूर्व वर्षांच्या तुलनेत या दिवाळीत कमी ध्वनी प्रदूषण

पुणेकरांना दिलासा! कोरोनापूर्व वर्षांच्या तुलनेत या दिवाळीत कमी ध्वनी प्रदूषण

googlenewsNext

पुणे: मागील काही दिवसांपासून वाढते ध्वनी प्रदूषण हे पुणेकरांची डोकेदुखी वाढवत आहे. यापूर्वी दिवाळीच्या काळात तर यात मोठी भर पडत होती. यावर्षीच्या दिवाळीत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. 2021 च्या दिवाळीत मागील काही वर्षांपेक्षा कमी ध्वनी प्रदूषण झाल्याचे दिसले आहे. यावर्षी ध्वनीची सर्वात जास्त पातळी 83 डेसीबल एवढी रेकॉर्ड झाली आहे, जी मागील काही वर्षांच्या (100 डेसीबल) रेकॉर्डपेक्षा कमी आहे. हे सर्व रेकॉर्ड 4 नोव्हेंबरचे लक्ष्मी पुजनाच्या दिवसाचे आहेत. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ध्वनी प्रदुषणात घट झाल्याची माहिती दिली. शिंदे म्हणाले, यावर्षीच्या दिवाळीतील तीन-चार दिवसांचे ध्वनीची तीव्रता कोरोनाच्या पुर्वीच्या दिवाळींपेक्षा कमी होती. त्याकाळात ही ध्वनीची तीव्रता 100 डेसीबलपेक्षा जास्त होती. दिवाळीत गुरुवारी (लक्ष्मी पुजन) दिवसा ध्वनीची तीव्रता 83 डेसीबल होती तर रात्री 74.7 डेसीबल रात्रीच्या सुमारास होती.

MPCB ​​च्या अहवालानुसार, कर्वे रोड (87.6 dB) परिसरात दिवसा सर्वात जास्त आवाजाची पातळी नोंदवली गेली तर स्वारगेट (77.6 dB) परिसरात रात्री सर्वात जास्त आवाजाची पातळी नोंदवली गेली. "फटाक्यांचा वापर मागील वर्षांच्या म्हणजेच २०१८-१९ च्या तुलनेत खूपच कमी आहे," असेही शिंदे म्हणाले. 

Web Title: less noise pollution 2021 diwali as compared to pre corona years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.