होता श्वान म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचली मालकीण .... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:58 PM2019-04-18T21:58:33+5:302019-04-18T21:59:25+5:30

काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती या म्हणीचा अनुभव मंगळवारी संध्याकाळी ‘त्या ’ महिलेला आला..

The leopard attack was read as a dog. | होता श्वान म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचली मालकीण .... 

होता श्वान म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचली मालकीण .... 

Next

ओझर :  काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती या म्हणीचा अनुभव मंगळवारी संध्याकाळी ‘त्या ’ महिलेला आला.. ती होती अंगाचा थरकाप उडवणाऱ्या बिबट्या आणि आपल्या मालकीणीच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या श्वानाची झुंज.. या हल्ल्यात महिलेनेही तत्परता व धाडस दाखवत आपल्या प्रामाणिक मुक्या प्राण्याचा जीव वाचविला..या घटनेत बिबट्याच्या तावडीतून महिलेची सुखरुप तर व श्वानाची जखमी अवस्थेत सुटका झाली.. पण या घटनेने होता श्वान म्हणून वाचली  मालकीणबाई  म्हटले तर नवल नाही. ... 
 
 शिरोली बुद्रुक येथील तळवस्ती येथे मंगळवारी (दि.१६)  रोजी निता योगेश थोरवे ह्या सायंकाळी जनावरांना घास गवत कापत होती. टॉमी नामक श्वान देखील मालकिणीच्या आजुबाजूला रेंगाळत होता. अचानक घास गवताच्या लगत असलेल्या उसाच्या शेतातून बिबटयाने टॉमीवर झड़प घालून त्याची मानगुट पकडत त्याला उसाच्या शेतात ओढुन नेले. ही घटना पाहुन घाबरलेल्या अवस्थेत नीता यांनी जोरात आरडा ओरडा केल्याने घरातून सासरे अर्जूनमामा थोरवे ,पती योगेश थोरवे,  लक्ष्मण शेरकर ,मुले विराज,प्रथमेश यांनी प्रसंगावधान राखून हातात काठी घेवून मोठा आवाज करत बिबटयाला पळवून लावले. मोठ्या आवाजाने बिबटया टॉमीला उसात सोडून पळून गेला. बिबटयाच्या तावड़ीतुन सुटलेला श्वान आपल्या मालकाच्या आवाजाने जखमी अवस्थेतच उसाच्या बाहेर आला. त्याच्या मानेला वरच्या बाजूला दोन्ही बाजूने बिबटयाच्या दातांच्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल मनीषा काळे  यांनी घटनास्थळी भेट देवून या वस्तीत बिबटयाचा वावर असल्याले पिंजरा लावणार असल्याचे तेथील ग्रामस्थांना सांगितले. टॉमी नामक श्वानाने आपला जीव धोक्यात घालून आपल्याला दररोजच्या जेवणाशी इमान राखत मालकीणीचा जीव वाचविला असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Web Title: The leopard attack was read as a dog.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.