माळशेज घाटात कारवर दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:26 PM2021-06-11T22:26:42+5:302021-06-11T22:32:29+5:30

माळशेज घाटात सध्या पाऊस तसेच दाट धुके आहे. या घाटातून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते.

The landslide on car in Malshej Ghat; Fortunately | माळशेज घाटात कारवर दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

माळशेज घाटात कारवर दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

googlenewsNext

ओतूर : पावसाळा सुरू होताच कल्याण-नगर महामार्गावरील आणे येथील माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या व नगरकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या शुक्रवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास मोटारीवर दरड कोसळली आहे. यात कारचे नुकसान झाले तर दोघेजन बालंबाल बचावले.

माळशेज घाटात सध्या पाऊस तसेच दाट धुके आहे. या घाटातून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते. चहा पिण्यासाठी ते घाटात कार बाजुला लाऊन खाली उतरले. हॉटेलमध्ये पोहचताच कारमधील दोन प्रवासी मित्र चहा पिण्यासाठी कार रस्त्याच्या कडेला पार्क करून चहाच्या हॉटेलात पोहचले. याच वेळी कारवर मोठी दरड कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला. गाडीत कुणी नसल्याने दुर्घटना टळली.

घाटात मोबाइलला रेंज मिळत नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माळशेज घाटात गाड्या जाऊ शकतात त्याच लेनवर दरड कोसळली आहे. काही वेळातच ती बाजूला करण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्याने दोन्ही बाजूच्या गाड्या सोडल्या गेल्या. पण काहीवेळ माळशेज घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माळशेज घाटात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते आणि त्यात आता दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी दाखळ झाले असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

Web Title: The landslide on car in Malshej Ghat; Fortunately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.