Koregaon Bhima Inquiry Commission: परमबीर सिंग, रश्मी शुक्लांना समन्स बजावा, हिंसाचाराबाबत गाेपनीय माहिती असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:06 PM2021-10-22T21:06:35+5:302021-10-22T21:06:44+5:30

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने शुक्रवारी आदेश दिले आहेत

koregaon bhima inquiry commission Parambir Singh, Rashmi Shukla should be summoned | Koregaon Bhima Inquiry Commission: परमबीर सिंग, रश्मी शुक्लांना समन्स बजावा, हिंसाचाराबाबत गाेपनीय माहिती असण्याची शक्यता

Koregaon Bhima Inquiry Commission: परमबीर सिंग, रश्मी शुक्लांना समन्स बजावा, हिंसाचाराबाबत गाेपनीय माहिती असण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देदाेघांना साक्षीकरिता आयाेगासमाेर हजर राहून साक्ष देण्याबाबत समन्स काढण्यात यावे

पुणे : आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने शुक्रवारी आदेश दिले आहेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला, त्यावेळी परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि रश्मी शुक्ला हे पुणे पोलीस आयुक्त या पदावर होते, असे ॲड. आशिष सातपुते यांनी म्हटले आहे. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना (Koregaon Bhima Inquiry Commission) आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परामबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्त्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक आहे. या दाेघांना साक्षीकरिता आयाेगासमाेर हजर राहून साक्ष देण्याबाबत समन्स काढण्यात यावे, या मागणीस काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगाने मान्यता दिली आहे.

काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगाचे वकील आशिष सातपुते यांनी चाैकशी आयाेगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्याकडे याबाबत अर्ज सादर केला हाेता. १ जानेवारी २०१८ राेजी काेरेगाव भीमा हिंसाचार घटना घडली. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पाेलीस महासंचालक हाेते. त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गाेपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली हाेती. त्याअनुषंगाने त्यांची आयाेगासमाेर साक्ष घेणे आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या पुण्याचे तत्कालीन आयुक्त असल्याने त्यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण माहिती असू शकते. त्यामुळे या दाेघांना चाैकशीसाठी आयाेगासमाेर हजर राहण्यासाठी समन्स बजावावे, अशी अर्जाद्वारे सातपुते यांनी मागणी केली होती. ती आयोगाने मंजूर केली आहे.

Web Title: koregaon bhima inquiry commission Parambir Singh, Rashmi Shukla should be summoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.