त्रैलोक्याचा राजा सुना सुना ! जेजुरी गडावर भविकांविना महाशिवरात्री साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:53 PM2021-03-11T16:53:54+5:302021-03-11T17:04:11+5:30

शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित; महाशिवरात्रीला प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याची वेळ..

King of the three worlds! Celebration of Mahashivaratri without devotee at Jejuri fort | त्रैलोक्याचा राजा सुना सुना ! जेजुरी गडावर भविकांविना महाशिवरात्री साजरी

त्रैलोक्याचा राजा सुना सुना ! जेजुरी गडावर भविकांविना महाशिवरात्री साजरी

googlenewsNext

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरातील तिन्ही लोकीचे शिवलिंग मध्यरात्रीनंतर अडीच वाजता उघडण्यात आले. प्रशासनाने दिलेले आदेश व सुचनेनुसार मोजके पुजारी ,मानकरी व सेवेकरी यांचे हस्ते तिन्ही शिवलिंगाची पूजा -अभिषेक करण्यात आले. शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित होऊन प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याची वेळ आली तसेच जमावबंदी आदेश असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

जेजुरीतील महाशिवरात्री उत्सवाला विशेष महत्व आहे .महाशिवरात्रीच्या मध्यरात्री मुख्य मंदिर कळसातील व भुगर्भातील शिवलिंग उघडले जाते .मानकरी ,सेवेकरी ,पुजारी यांचे हस्ते पूजा - अभिषेक करण्यात आल्यानंतर भाविकांना दोन दिवस दर्शनासाठी खुले होते. त्यानंतर पुन्हा पूजन करण्यात येऊन दोन्ही शिवलिंग बंद केली जातात .मुख्य मंदिराच्या कळसातील शिवलिंग स्वर्गलोकीचे तर भुगर्भातील शिवलिंग पाताळलोकीचे समजले जाते व मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकीचे समजले जाते .तिन्ही शिवलिंगाचे म्हणजेच त्रैलोकीचे दर्शन फक्त महाशिवरात्रीला होत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.

मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने राज्यातील सर्व जत्रा यात्रा उत्सव रद्द केले असल्याने जेजुरीचे मंदिर ही भाविकांना  देवदर्शनासाठी  बंद ठेवण्यात आले आहेत . शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भुगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे .तसेच शनिवार(दि.१३)पासून भाविकांना गडकोट मुखदर्शनासाठी खुला होणार आहे.

यंदा मोजक्या पुजारी , मानकरी ,सेवेकरी यांच्यावतीने पूजा ,अभिषेक व सालाबादप्रमाणे  परंपरेनुसार धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी मुख्य आठवडेकरी पुजारी महेश बारभाई  शुभम सातभाई ,वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, सुधाकर मोरे ,गणेश आगलावे ,चेतन सातभाई आणि मानकरी सेवेकरी उपस्थित होते .

यावर्षी भाविक गडकोट आवारात नसल्याने मुख्य मंदिर आवार सुनेसुने वाटत होते सदानंदाचा येळकोट ,येळकोट येळकोट जयमल्हार या गजराशिवाय यंदाचा महाशिवरात्री उत्सव पार पडला ,
 

Web Title: King of the three worlds! Celebration of Mahashivaratri without devotee at Jejuri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.