मुळशीमध्ये ‘खाकी पॅटर्न’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:33 PM2019-04-15T19:33:21+5:302019-04-15T19:40:22+5:30

मुळशी तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळशी ‘खाकी पॅटर्न ’...

'Khaki Pattern' against 402 people in Mulshi | मुळशीमध्ये ‘खाकी पॅटर्न’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मुळशीमध्ये ‘खाकी पॅटर्न’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext

पुणे : मुळशी तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळशी ‘खाकी पॅटर्न ’ दाखवत ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या काळात तालुक्यात शांतता अबाधित राहून कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमच्याकडून ४०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच कारवाईचा हा आकडा वाढू ही शकतो, अशी माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये मोक्कांतर्गत ५ जणांवर,तर कलम १०७ प्रमाणे ११७ , कलम १०९ प्रमाणे १६,कलम ११० प्रमाणे ३३ आणि कलम १४९ प्रमाणे ९५ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तर कलम १४४(२)(३) प्रमाणे १०९ जणांना निवडणुकीच्या काळामध्ये मुळशी तालुक्यामधुन हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे दोन प्रस्ताव हद्दपार १६ सराईत वर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ ब प्रमाणे एम.पी.डी.ए.प्रमाणे एका सराईत विरोधात प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. तसेच अवैध धंद्यांविरुद्ध वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. 
 पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील,हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई गोरे-पाटील यांच्या सूचनेनुसारपौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे,पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते,पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते,पोलीस हवालदार शंकर नवले,संदीप सपकाळ,सुनील मगर,अब्दुल शेख,पोलीस नाईक संजय सुपे,सागर बनसोडे व महिला पोलीस शिपाई तृप्ती भंडलकर यांनी ही सर्व कारवाई केली. 

Web Title: 'Khaki Pattern' against 402 people in Mulshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.