पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी आणि कौस्तुभ मराठेंना अटक; १८ गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '५ कोटी' लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:42+5:302021-09-15T14:12:57+5:30

मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने-चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम, तसेच त्यावरील परतावा न देता १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रुपयांची फसवणूक केली

Kaustubh Marathe arrested along with Manjiri Marathe | पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी आणि कौस्तुभ मराठेंना अटक; १८ गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '५ कोटी' लुबाडले

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी आणि कौस्तुभ मराठेंना अटक; १८ गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '५ कोटी' लुबाडले

googlenewsNext
ठळक मुद्देमराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीने आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त

पुणे : मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने-चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम, तसेच त्यावरील परतावा न देता १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे या दोघांना पोलिसांनीअटक केली. न्यायालयाने त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी (दि.१३) विशेष सत्र न्यायालयात एमपीआयडी शिवाजीनगर येथे दोघे हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे ) याला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी मयत मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड, तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणात २१ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल आहे.

अटक दोघे आरोपी हे त्यांचे राहण्याच्या ठिकाणी शोध घेतला असता आढळून आले नाहीत. तपास यंत्रणा आणि न्यायालयास वास्तव्याबाबत निश्चित माहिती देत नाहीत, तसेच तपासकामी सहकार्यही करीत नाहीत, त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणावरून दस्ताऐवज हस्तगत करणे, 2012 नंतर खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आर्थिक व्यवहाराची माहिती प्राप्त करणे व दस्तऐवज हस्तगत करणे, आरोपी मंजिरी मराठे यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठविण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या.

फिर्यादीसह साक्षीदार यांनी गुंतवणूक केलेल्या रकमा, सोने-चांदी हे आरोपी भागीदार असलेल्या मराठे ज्वेलर्समध्ये जमा करण्यात आल्या असून, भागीदारी संस्थेच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्र, तसेच इतर कागदपत्रांबाबत आरोपींनी माहिती सादर केलेली नाही. आरोपींनी गुंतवणुकीपोटी साक्षीदार व इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या, तसेच गुंतवणूकदारांचा डेटा नक्की कोणत्या संगणकामध्ये आहे याबाबत तपास करणे, गुंतवणूकदार यांच्याकडून ठेवी स्वीकारल्याबाबत ठेवीदारांना स्वत:च्या हस्ताक्षरात ठेव पावती दिलेली आहे. त्या पावतीवरील हस्ताक्षराबाबत आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने घेऊन हस्ताक्षर पुरावा प्राप्त करायचा आहे.

आरोपीस जामीन मिळाल्यास ते देशाबाहेर जाण्याची, तसेच साक्षीदारांना धमकाविण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, आणखी साक्षीदार संपर्क साधत आहेत, तसेच मराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीने आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त असून, त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एम. बी. वाडेकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: Kaustubh Marathe arrested along with Manjiri Marathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.