राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:22 PM2020-06-05T16:22:51+5:302020-06-05T16:23:31+5:30

50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज सुरु होणार

Judicial proceedings in the state will start from June 8; Instructions from Mumbai high court | राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत कोर्टाचे कामकाज चालणार

पुणे : लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज येत्या आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरु होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु होणार आहे. मुंबई हायकोर्टाने याबाबत राज्यातील सर्व न्यायालयांनी सूचना दिल्या आहेत.

लॉकडाउनमुळे 23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद होते. फक्त तातडीच्या दाव्यांवर न्यायालयात सुनावणी सुरु होती. आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये कोर्टाचे कामकाज सुरु होणार होणार आहे. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत कोर्टाचे कामकाज चालणार आहे. 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज सुरु होणार आहे.
प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन कामाच्या वेळा बदलू शकतात. मात्र शिफ्टच्या वेळा बदलू शकत नाहीत.
न्यायाधीशांनी कोटार्तील कामकाज करताना 15 पेक्षा जास्त मँटर बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड सतीश मुळीक म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालये सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत उपाययोजना आणि सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्येक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रमुख न्यायाधीशांबरोबर लवकरच बैठक घेणार आहेत.

......
सुचविण्यात आलेल्या उपाययोजना: 

- प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे.
- सँनिटायझर, पाणी, साबण याची सुविधा हात स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध करावी
- कोर्ट हॉल स्वच्छ करण्यात यावेत.
- कम्पुटरचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो इतरांना कम्पुटर वापरु देऊ नये.
- कोर्टाच्या परिसरात किऑस्कच्या वापरामुळे संसर्ग होऊ नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत किऑस्क बंद ठेवावेत.
- कोर्टातील स्वच्छतेबाबत निगराणी आणि पाहणी करण्यासाठी न्यायिक अधिकारी नेमावेत.
- स्वच्छेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार.
.....

Web Title: Judicial proceedings in the state will start from June 8; Instructions from Mumbai high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.