जगातील सर्वात उंच शिखर 'Mount Everest' वर जयची यशस्वी चढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:36 PM2022-05-12T20:36:11+5:302022-05-12T20:36:21+5:30

निष्णात रॉक क्लायम्बर असलेल्या जयचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले

Jay kolhatkar successful ascent of the world highest peak Mount Everest | जगातील सर्वात उंच शिखर 'Mount Everest' वर जयची यशस्वी चढाई

जगातील सर्वात उंच शिखर 'Mount Everest' वर जयची यशस्वी चढाई

Next

पुणे : गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचा (GGIM) विद्यार्थी असलेल्या मुंबईच्या जय कोल्हटकर याने ८८४८ मीटर उंच असलेल्या जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. १२ मे २०२२ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजता जय एव्हरेस्टच्या शिखरमाथ्यावर पोहोचला. निष्णात रॉक क्लायम्बर असलेल्या जयचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. 

जयच्या गिर्यारोहणाची सुरवात GGIM मध्येच झाली. GGIM च्या पहिल्यावहिल्या ‘बेसिक रॉक क्लायम्बिंग कोर्स’मध्ये तो सहभागी झाला. या कोर्समध्ये त्याला ‘सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी’चा मान त्याने मिळविला. यानंतर त्याने रशियातील माउंट एलब्रुस व नेपाळमधील माउंट मेरा शिखरावर GGIM च्या माध्यमातून चढाई केली. 

गेली दोनहून अधिक वर्षे जय GGIM चे जेष्ठ प्रशिक्षक असलेल्या विवेक शिवदे व एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होता. त्याला जेष्ठ गिर्यारोहक व श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे देखील मार्गदर्शन लाभले. १२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता तो कॅम्प ४ ला सुखरूप परतला असून पुढे कॅम्प २ व बेस कॅम्पपर्यंत उतराई करेल. 

गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (GGIM) ही दक्षिण भारतातील एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था असून गिर्यारोहकांना तंत्रशुद्ध व सूत्रबद्ध प्रशिक्षण देण्यात आघाडीवर आहे. जय हा संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेला चौथा एव्हरेस्ट शिखरवीर असून या आधी व्यंकटेश माहेश्वरी, राहुल इनामदार व जितेंद्र गवारे यांनी एव्हरेस्ट शिखर चढाई यशस्वी केली आहे.

Web Title: Jay kolhatkar successful ascent of the world highest peak Mount Everest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.