ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:42 PM2021-10-22T12:42:36+5:302021-10-22T17:00:26+5:30

पुढे बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तीचा उल्लेख केला जातोय. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत

jarandeshwar sugar factory ajit pawar ed it raid baramati | ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत: अजित पवार

ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत: अजित पवार

Next

पुणे: काही लोकांनी 25 हजार, 10 हजार कोटींचे घोटाळे झाल्याचे आरोप केले. त्यावर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशी केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले आहे. परंतु काही जण पुन्हा-पुन्हा तेच खोटे आरोप करून बदनामी करत आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं.

साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीची यादीच वाचली- 

राज्यातल्या साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीची यादीच अजित पवारांनी वाचली पत्रकार परिषदेत वाचली. राज्यातील वेगवेगळ्या साखर कारखाने विकले गेले. त्यावर कोणीही चर्चा करत नाही, बोलत नाही. 64 वेगवेगळे कारखाने काही कंपन्यांनी विकत घेतले, दुसऱ्याला चालवायला दिले असल्याचेही पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तीचा उल्लेख केला जातोय. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत. बदनामी करण्यासाठी, जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवाया सुरू आहेत. बेमानी केली असेल तर गुन्हा दाखल करा ना असं आव्हान अजित पवार यांनी केले.

Web Title: jarandeshwar sugar factory ajit pawar ed it raid baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.