समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:45 PM2019-08-26T20:45:18+5:302019-08-26T20:51:31+5:30

गुप्तचर विभागाचे माध्यमातून सहा दहशतवादी समुद्रामार्गे  देशात घुसल्याची माहिती मिळाली होती...

Jaish ready to attack by sea route : Navy Chief Admiral Karambeer Singh | समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग 

समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग 

Next
ठळक मुद्देसर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्जमनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू

पुणे :  जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहेत. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, नौदलातर्फे समुद्रात चोख लक्ष ठेवण्यात येत आहेत. दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी आम्ही लक्ष ठेऊन सर्व प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याची माहिती नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.
पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्तविद्यमाने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंत्नरी सभागृहात जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.   
    कर्मबीर सिंग म्हणाले, गुप्तचर विभागामार्फेत समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आम्ही समुद्रात टेहळणी वाढवीली आहे. गुप्तचर विभागाचे माध्यमातून सहा दहशतवादी समुद्रामार्गे  देशात घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 
    मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर  समुद्र सुरक्षेच्या दृष्टीने मोमुंबईतील 26/11 च्या हल्यानंतर देशाच्या समुद्री सुरक्षेबाबत बरेच बदल झाले आहे. सुरक्षेच्या दृष्ट्रीने अनेक  उपाययोजना राबविण्यात येत आहे. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्रीत रित्या काम केले जात आहेत. सागरी सीमांवर रडार यंत्रणा उभारण्यात येत आहे. 
   जागतिक महासत्ता होण्याची चिनची महत्वाकांशा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे.  त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. या क्षेत्रात भारताच्या राष्ट्रहीताला अजुनतरी कुठलाही धोका नाही. मात्र, आम्ही प्रत्येक परिस्थीतीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत.  

...........
मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू
नौदलाला मनुष्यबळाची कमतरता आहे. ही तफावत भरून काठण्यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत.  लवकरच यातून मार्ग काढण्यात येणार आहे.

Web Title: Jaish ready to attack by sea route : Navy Chief Admiral Karambeer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.