जय गणेश! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठचा 'बाप्पा' विराजमान होणार मुख्य मंदिरातचं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 06:00 PM2021-09-02T18:00:52+5:302021-09-02T18:00:59+5:30

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार

Jai Ganesh! The 'Bappa' of the rich Dagdusheth of Pune will be enthroned in the main temple | जय गणेश! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठचा 'बाप्पा' विराजमान होणार मुख्य मंदिरातचं

जय गणेश! पुण्यातील श्रीमंत दगडूशेठचा 'बाप्पा' विराजमान होणार मुख्य मंदिरातचं

googlenewsNext
ठळक मुद्दे१० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोमहागणेश याग, मंत्रजागर याबरोबरच श्रीं ची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभवता येणार

पुणे : सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपती मुख्य मंदिरामध्येच विराजमान होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.

मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर  जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा ऑनलाईन 

शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक अथर्वशीर्ष पठण व श्रीं ची महाआरती ऑनलाईन पद्धतीने होईल. तर, १० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोज महागणेश याग, मंत्रजागर याबरोबरच श्रीं ची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभवता येणार आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS': http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Jai Ganesh! The 'Bappa' of the rich Dagdusheth of Pune will be enthroned in the main temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.