अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:17 PM2020-01-30T14:17:40+5:302020-01-30T14:31:28+5:30

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अशी दोन पदे मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आक्रमक.

Jagdish mulik Will be give tough fight when Ajit Pawar front ? | अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?

अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य नावेही शहराध्यक्षपदाच्या होती स्पर्धेत शांत, विचारी व निर्णयाआधी किमान पन्नास वेळा विचार करणारे, अशी मुळीकांची ख्याती जगदीश मुळीक हे सन २०१४मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकांतील पराभव पवारांच्या जिव्हारी

पुणे : समोर अजित पवारांसारखा तगडा राजकारणी पालकमंत्री म्हणून आलेला असताना आमदार असूनही पाच वर्षात विधानसभेत कसलीही धडाकेबाज कामगिरी न करणारे माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्ष म्हणून का केली असावी, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यांच्याबरोबरच या पदासाठीच्या स्पर्धेत असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांसाठीही पक्षश्रेष्ठींनी केलेली ही निवड अनपेक्षित व अनाकलनीय ठरली आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमवाव्या लागल्यानंतरही पक्षश्रेष्ठींना पुण्यातील संघटना अशी पणाला का लावावी वाटली, असा प्रश्न कार्यकर्ते आपापसात विचारताना दिसत आहेत. जगदीश मुळीक हे सन २०१४मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार झाले. शांत, विचारी व कोणताही निर्णय घेण्याआधी किमान पन्नास वेळा विचार करणारे, अशी त्यांची ख्याती आहे. पक्षाच्या पुण्यातील अन्य काही आमदारांना चिकटले तसे कोणतेही किटाळ त्यांना पाच वर्षांत चिकटले नाही. पक्षाच्या कोणत्याही गटबाजीत ते नसतात. कोणत्याच नेत्याचा त्यांच्या नावावर शिक्का नाही; मात्र तरीही ते राजकारणात प्रवीण असल्याचे त्यांनी या निवडीतून दाखवून दिले आहे.


याआधी आमदार असताना त्यांनी नगरसेवक असलेले सख्खे भाऊ योगेश यांना स्थायी समितीवर अध्यक्ष म्हणून निवडून आणतानाही अशीच बेरकी खेळी खेळली होती. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन त्यांनी बरोबर स्थायी समिती घेतली व त्यातून पालिकेच्या माध्यमातून मतदारसंघात काही कोटी रुपयांची कामे करून घेतली. मात्र, त्याचा त्यांना उपयोग झाला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता लगेच एकदम शहराध्यक्षपद देण्याचे कारण काय, हा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अशी दोन पदे मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आक्रमक झाले आहेत. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकांतील पराभव त्यांना छळतो आहे. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी संघटना मजबूत करण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यांच्या या आक्रमकपणाला मुळीक कसे पुरे पडणार? त्यांना उत्तर तरी ते देतील की नाही? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
अन्य नावेही शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत होती. त्यातली काही कोथरूडचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची होती; मात्र माळ मुळीक यांच्या गळ्यात पडली. यामागे लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार बापट यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले, हे कारण असल्याचे बोलले जाते. मात्र, शहरावर वर्चस्व ठेवण्याच्या दोन नेत्यांच्या स्पर्धेत संघटना पणाला लागली, असे काही कार्यकर्त्यांना वाटत आहे.

Web Title: Jagdish mulik Will be give tough fight when Ajit Pawar front ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.