मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:28 PM2019-09-17T14:28:35+5:302019-09-17T14:28:51+5:30

या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार आहे.

'ITMS' to system for control on Bastard vehicles on Mumbai-Pune highway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

Next
ठळक मुद्दे४० कोटींची तरतूद : सीसीटीव्ही मॉनिटरिंगद्वारे वाहनांवर लक्ष आणि दंड वसुली

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये झालेली वाढ आणि वाहनांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे या मार्गावरुन जाणे धोकादायक ठरु लागले आहे. अपघातांना तसेच बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आता महामार्गपोलिसांकडून  ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा (आयटीएमएस) वापर केला जाणार आहे. 
या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार असल्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. 
महामार्ग पोलीस आता आयटीएमएस ही सिस्टीम राबविणार आहेत. द्रुतगती मार्ग एकूण ९४.५ किलोमीटरचा आहे. सहा पदरी असलेल्या या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. हाय रिज्यूलेशनचे या सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक गाडीचे मॉनिटरिंगही शक्य होणार आहे. कॅमेºयांद्वारे गाड्यांच्या नंबरप्लेट, त्यांचा वेग, लेन शिस्त पाळली जात आहे, की नाही यावर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातून गाडीच्या मार्गावरही लक्ष ठेवता येणार असून, आवश्यकता भासेल तसे अशा वाहनांना महामार्गावरच बाजूला घेऊन कारवाई करणे शक्य होणार आहे. नियमभंग करणाºया वाहनांच्या नंबरप्लेटवरुन वाहनचालक-मालकांना आॅनलाइन चलन देऊन दंड आकारणीही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, सध्या हा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. 
मुंबई-पुण्यातील अंतर कमी वेळेत कापले जावे आणि व्यापाराला चालना मिळावी याकरिता द्रुतगती उभारण्यात आला. गेल्या काही वर्षात या रस्त्यावरील प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. चालू वर्षात ऑगस्ट अखेरीस ६३ अपघात झाले असून, यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरीस ३४ अपघातांत ३८ जणांचा मृत्यू झाला होता. वाहनांचा अमर्यादित वेग आणि लेन शिस्त पाळली जात नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. अति वेगामुळे टायर फुटण्याच्या तसेच मोटारी उलटल्याच्याही घटना घडत असतात.
  
..........
महामार्ग पोलिसांनी या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता जड वाहनांना शेवटच्या लेनमधून जाणे बंधनकारक केले आहे. तसेच काही काळ ड्रोनद्वारे रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा प्रयत्न अल्पकाळातच बंद करावा लागला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आल्यास तसेच लेनशिस्त पाळली गेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. 
.......

Web Title: 'ITMS' to system for control on Bastard vehicles on Mumbai-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.