issue of surveillance, maintenanceof animals and snakes due to municipal corporation neglected | महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

ठळक मुद्देएक वर्षांपासून देखभालीचा खर्च देण्यास टाळाटाळपन्नास टक्के खर्च हे भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या व अनुदानमधून कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसित

पुणे: महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालविण्यात येणारे सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षांला सुमारे १ कोटी ४४ लाख ५३ हजार खर्च येतो. यापैकी पन्नास टक्के खर्च हे काम करणारी भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या व अनुदानमधून करण्यात येतो. परंतु उर्वरीत पन्नास टक्के खर्च महापालिकेकडून देणे अपेक्षित असताना केल्या एक वर्षांपासून महापालिकेच्या हिस्स्याचे ७८ लाख ८९ हजार १६२ रुपये संबंधित संस्थेला देण्यास टाळाटाळ सुरु आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. परंतु गुरुवारी (दि.४) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठीकत हा प्रस्ताव केवळ कार्यपत्रिकेवर न घेतल्याने मंजूर झाला नाही. महापालिकेचा भोंगळ कारभार आणि पदाधिका-यांच्या उदासिनतेमुळे कात्रज सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयावर ह्यअनाथह्ण होण्याची वेळ आली आहे.
    महापालिकेच्या वतीने कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसीत करण्यात आले असून, यामध्ये एक भाग सर्पोद्यान व वन्य प्राण्याचे अनाथालय हा आहे. या प्राणी संग्रहालयास वषार्ला सरासरी १८ लाखांहून अधिक नागरिक भेट देतात. यासाठी नागरिकांकडून घेण्यात येणा-या प्रवेश शुल्काची रक्कम अत्यात तुटपुजी असल्याने या प्राणी संग्रहालयावर महापालिकेला आपल्या अंदजापत्रकामधून खर्च करावा लागतो. यामध्ये गेल्या ३३ वर्षांपासून प्राणी संग्रहालयात असलेल्या सर्पोद्यन व वन्य प्राणी अनाथालय देखभालीचे कामकाज भारतीय सर्पविज्ञान संस्थे मार्फत करण्यात येते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या वतीने  ८ आॅगस्ट २०१५ ते  ७ आॅगस्ट २०१८ या कालावधीसाठी देण्यात आले होते. प्रस्तावाची मुदत संपल्यानंतर कामास मुदत वाढ देणे व गेल्या वर्षभर केलेल्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देणे अपेक्षित होते. परंतु गेल्या एक वर्षांपासून संस्थेचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.
    सर्पोद्यानच्या देखभालीसाठी वषार्ला अपेक्षीत खर्च सुमारे ६२ लाख २२ हजार ६९२ इतका आहे. यामध्ये कर्मचा-यांचे वेतन, प्राण्यांचे खाद्य, खाद्य पुरक, प्राण्यांचे पिंजरे, दुरुस्ती, सौंदर्यकरण, प्राण्याचे औषधे व इतर खर्च येतो. यापैकी पन्नास टक्के म्हणजे तब्बल ३१ लाख ११ हजार रुपयांचा निधी संस्था विविध संस्थांकडून मिळणारी  देणग्या व अनुदानमधून करण्यात येतो. तर वन्य प्राणी अनाखालयाच्या देखभालीसाठी वषार्ला सुमारे ८२ लाख ३० खर्च येतो. यापैकी देखील पन्नास टक्के खर्च संबंधित संस्था देणग्या, अनुदानामधून करते. त्यामुळे शिल्लक व महापालिकेच्या वाट्याचा खर्च संबंधित संस्थेला दर वर्षी देणे अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या वर्षांसाठीचा खर्च सुमारे ७८ लाख ८९ हजार रुपये महापालिकेने संस्थेला देणे अपेक्षित आहे. तसेच हे काम पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा गेल्या ३३ वर्षांपासून काम करणा-या भारतीय सर्पविज्ञान संस्थेला देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी एक वर्षांचा कालावधी गेला आहे. त्यात आता स्थायी समितीच्या पदाधिका-यांकडून याबात दाखविण्यात येत असलेल्या उदासिनतेमुळे सर्पोद्यान व वन्य प्राण्यावर आनाथ होण्याची वेळ आली आहे. 


Web Title: issue of surveillance, maintenanceof animals and snakes due to municipal corporation neglected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.