Indore-Daund Express: इंदौर-दौंड एक्सप्रेसचा मुंबई-पुणे मार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:05 AM2021-09-27T10:05:52+5:302021-09-27T10:23:15+5:30

आज सकाळी आठ वाजता इंदोर-दौंड एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली

Indore Daund Express crashes on Mumbai Pune route | Indore-Daund Express: इंदौर-दौंड एक्सप्रेसचा मुंबई-पुणे मार्गावर अपघात

Indore-Daund Express: इंदौर-दौंड एक्सप्रेसचा मुंबई-पुणे मार्गावर अपघात

Next

लोणावळा: इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. हा प्रकार आज सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले होते. दरम्यान या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. लोणावळा रेल्वे स्थानकात येताना हा प्रकार घडला असल्याने तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

आज सकाळी आठ वाजता इंदोर-दौंड एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली. अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
 
अखेर रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येऊन 9 वाजून 27 मिनीटांनी रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे. घरलेलेले दोन्ही डबे व जनरेटर कार डब्बा रेल्वेपासून वेगळे करण्यात आले आहे. मागच्या इंजिनचा वेग वाढल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Indore Daund Express crashes on Mumbai Pune route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app