राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन; अजित पवारांची फटकेबाजी अन् कार्यकर्त्यांना दिला 'कानमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:37 PM2021-06-19T19:37:00+5:302021-06-19T19:47:01+5:30

राष्ट्रवादीचं नवीन कार्यालय पुणे शहराला दिशा देणारे सांस्कृतिक व्यासपीठ होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

Inauguration of new NCP office in Pune; Ajit Pawar 'advice' to activists | राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन; अजित पवारांची फटकेबाजी अन् कार्यकर्त्यांना दिला 'कानमंत्र'

राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन; अजित पवारांची फटकेबाजी अन् कार्यकर्त्यांना दिला 'कानमंत्र'

googlenewsNext

पुणे : आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते. सकाळी ७ वाजताच येऊन जाणार होतो. पण  कार्यकर्त्यांचा उत्साह घालवायला नको, त्यांना नाराज करायला नको म्हणून आलो. सोबत  दोन आमदार आहेत. सचिन पण आला असता पण आपले लोक मधाचा मोठेपणा दाखवत नाहीत अशा शब्दात जोरदार फटकेबाजी करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना "संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर असते. पवारसाहेब सुद्धा शाहू,फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करतात. आपणही सर्वजणांंना बरोबर घेऊन काम करायला हवे" असा  'कानमंत्र'ही दिला.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्याबरोबर राहून आम्ही राज्यातील जनतेच्या हिताचेच काम करतो आहे. मुख्यमंत्र्यांच्याबरोबर राहून काम करतो आहेत.सर्वांचे लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. दिलीपरावांच्याकडे होम आहे. त्यातूनही काम करतो आहोत.

पुढे पवार म्हणाले, पुण्यात नवी शहर कार्यकारिणी करावी लागेल. आता आपण २२ वर्षांचे झालो आहोत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचा प्रयत्न सुरु आहे. हे कार्यालय शहराला दिशा देणारे सांस्कृतिक व्यासपीठ होईल असा विश्वास आहे.पुण्यात काम केले आहे म्हणून दावा करतो आहे. त्यात काहींना काही देता आले नाही, त्यांचा नक्की विचार करू. लोकांंचे काम १०० टक्के होईल अशी खात्री देता येत नाही. पण होत नसेल तर समजावून सांगा, मी स्वतः तसेच काम करतो. माझे इथले ऑफिस माझा स्टाफ आठवड्यातून एकदा या कार्यालयात येईल कामात मदत करेल. 

वाद नको गटतट नको मतभेद नको; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला 
पक्षासाठी काम करताना वाद नको, गटतट नको, मतभेद नको. सर्वांचा मान ठेवा. पवार साहेब तसेच वागतात. आदराची वागणूक ज्येष्ठांना मिळेल याची काळजी घ्या.पुणे आणि पिंपरी चिंचवड ला पर्यटन साठी काय करता येईल यावर काम सुरू आहे. इथे रोजगार तयार व्हावा ही अपेक्षा आहे. कोणी काही टीका केली तर ऊत्तर द्यायच्या फंदात पडू नका. राज्याचे नेते बोलतील असे सांगा. हानी होईल असे वर्तन होणार नाही कार्यालयाची पायरी चढताना याची काळजी घ्या 

शिवसेनेला आणि राहुल गांधींना शुभेच्छा.. 
शिवसेनेचा आज वर्धापनदिन त्यांना शुभेच्छा देतो.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस त्यांंना शुभेच्छा देतो. तुम्ही नियमांचे पालन केले नाही ही   माझी खंत आहे. ती व्यक्त करायलाच हवी.

या कार्यक्रमाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वागत व प्रास्तविक केले. तसेच अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: Inauguration of new NCP office in Pune; Ajit Pawar 'advice' to activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.