...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:36 PM2021-03-25T19:36:26+5:302021-03-25T20:19:49+5:30

वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकत आंदोलन केल्यावर मनसेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता मनसेने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

If the question of citizens is raised, then the crime of 353 against MNS workers, then why not 420 against the officials for misconduct? | ...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का?

...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का?

googlenewsNext

पुणे : वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सर्वत्र ओला सुका कचरा टाकत मनसे स्टाईल आंदोलन करणाऱ्या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकत्यांविरुद्ध वानवडीपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेे. मात्र आता या प्रकरणामुुळे मनसे अधिक आक्रमक झाली आहे. कर्तव्यात कसूर व नागरिकांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा ४२० व २५३ चा गुन्हा दाखल करण्यासंबंधी मनसेच्या वतीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मनसेचे नगरसेवक व शहराध्यक्ष वसंत मोरे, महिला नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी गुरुवारी (दि.२५) वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

मोरे म्हणाले, कोंढवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कचरा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या घरातील ओला सुका कचरा उचलला जात नाही. तसेच रस्त्यावरही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे नगरसेवक असलेल्या साईनाथ बाबर यांच्या कार्यालयात नागरिकांनी कचऱ्याच्या पिशव्या आणून ठेवल्या. तसेच आम्ही जर महापालिकेला टॅक्स भरतो, स्वच्छ कंपनीसाठी पैसे मोजतो तर मग आमचा कचरा का नेला जात नाही असेही नागरिकांनी यावेळी सुनावले. त्यामुळे प्रशासनाला जाग यावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पण आमच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. 

याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रिय कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता.

सहायक आयुक्त किशोरी शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रभागांतील स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. याची साईनाथ बाबर यांनी गोरख इंगळे याच्याकरवी फोन करुन माहिती घेतली. शिंदे या कार्यालयात नाहीत, हे लक्षात आल्यावर बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे, अशी विचार केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. क़ार्यालयात सोबत आणलेला ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. पुन्हा कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये देखील कचरा टाकून घाण केली. तसेच कार्यालयातील इतर सहकार्‍यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला.  कोविड १९चे कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: If the question of citizens is raised, then the crime of 353 against MNS workers, then why not 420 against the officials for misconduct?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.