प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:31 PM2019-06-11T12:31:00+5:302019-06-11T12:37:49+5:30

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

I will not one inch land to given for airport | प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देपुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा एल्गार सासवड तहसीलवर मोर्चा : विमानतळ नकाशाच्या जाळल्या प्रती भविष्यात विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता

सासवड : ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ईडापीडा टळू दे विमानतळ जळू दे,’ अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल, तर येथील जमिनीवर आमचे रक्त सांडेल; पण आम्ही जमिनी देणार नाही, असा इशारा पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी दिला.संतप्त शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळाचा नकाशा जाळून निषेध व्यक्त केला. यामुळे भविष्यात विमानतळाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. यासाठी शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या आहेत. मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्याचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला  आहे. शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून याचा विरोध करण्यासाठी सोमवारी बाधित ग्रामस्थांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देऊन शासनाचा  निषेध केला. 


छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हा पुरंदर येथे करणार असल्याचे तीन वर्षांपासून शासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, वृत्तपत्रामधून वृत्त येते याव्यतिरिक्त प्रत्यक्षरीत्या या संभाव्य जागेत येणाºया गावांमध्ये बाधितांबरोबर कुठलीही चर्चा शासनाकडून केली जात नाही. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा विरोध करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी विमानतळविरोधासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. 
२४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळाबाबत नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये शेतकºयांना विमानतळाबाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे. तसेच, विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल, असे त्यामध्ये नमूद केले होते. मात्र, नोटीस प्रसिद्ध होऊन १७  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील कार्यालयात उपलब्ध झालेला नाही.   
......
शासनाच्या  धोरणाचा निषेध करुन तो चढला बोहल्यावर 
आधी लगीन कोंढाण्याचं व मगच रायबाचं’ असे म्हणत कुंभारवळण येथील बाधित शेतकरी कुंटुबातील युवक अनिकेत कामठे याने विमानतळाला विरोध दर्शवीत शासनाच्या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर विमानतळ काय कामाचा, असा सवाल केला. तसेच, नकाशा पाहण्यासाठी पुरंदर तहसील कार्यालयात गेलो असता आम्हालाच अजून नकाशा मिळाला नसल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे शासन आमची सर्व पातळ्यांवरून फसवणूक करत आहे. आमचा विमानतळाला विरोध आहे. आम्ही तशी हरकत प्रशासकीय पातळीवर दिलेल्या मुदतीत नोंदवणार आहोत, असे सांगून या मोर्चात सहभागी होऊन मगच लग्नकार्यासाठी मार्गस्थ झाला. 
...............
शेतकºयांना जाहीर नोटिशीद्वारे हरकत घेण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला. मात्र, याबाबत शेतकºयांना कल्पना नाही. प्रशासकीय पातळीवरदेखील नकाशा शेतकºयांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही.  शासन जाणूनबुजून शेतकºयांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या ६० दिवसांच्या कालावधीत विमानतळाला विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत. तसेच, कालावधी वाढवावा, हरकती घेण्यासाठी सासवडलाच व्यवस्था करावी अशा मागण्यादेखील करण्यात आल्या. - दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळविरोधी जन संघर्ष समिती)
...................
प्रस्तावित विमानतळाच्या 
नकाशाचे केले दहन
विमानतळाचा नकाशा शासनाने प्रसिद्ध केला आहे. मात्र, तो अद्याप तहसील कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी तो मिळवून शासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर नकाशाच्या प्रती जाळून विमानतळाला बाधितांनी विरोध दर्शविला.
..........
विमानतळाला आमचा विरोध कायम राहणार आहे. शासनही आमच्याबाबत उदासीन आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला, असे चित्र असल्याने प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकतीदेखील पुरंदर तहसील कार्यालयात घेण्याची परवानगी शासनाने द्यावी आणि विमानतळाचा नकाशाही या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विमानतळविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. 

Web Title: I will not one inch land to given for airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.