पुण्यात थंडीच्या मोसमात उकाड्याचा कहर; ७ व ८ जानेवारीला पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 11:23 PM2021-01-05T23:23:45+5:302021-01-05T23:24:29+5:30

पुणे जिल्हा व शहरात ४ दिवस ढगाळ हवामान राहणार

Hurricane hittng in Pune during winter season; Chance of rain on 7th and 8th January | पुण्यात थंडीच्या मोसमात उकाड्याचा कहर; ७ व ८ जानेवारीला पावसाची शक्यता 

पुण्यात थंडीच्या मोसमात उकाड्याचा कहर; ७ व ८ जानेवारीला पावसाची शक्यता 

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र राज्यावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात ऐन थंडीत उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. गेल्या १० वर्षातील डिसेंबर महिन्यातील सर्वात उष्ण असलेली पाचवी रात्र मंगळवार ठरली आहे. मंगळवारी सकाळी पुण्यातील किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

द्रोणीय स्थितीमुळे हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती रहाण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण व मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. पुढिल तीन-चार दिवस राज्यात रात्रीच्या थंडीचा कडाका कमी राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा व शहरात पुढील ४ दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

५, ६ व ७ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ८ जानेवारीला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
---

पुण्यातील सर्वात जास्त किमान तापमान असलेली रात्र (अंश सेल्सिअस)
२ डिसेंबर २०१३ - २१.५

२६ डिसेंबर २०१९ - २१.४
६ डिसेंबर २०१७ - २१.१

५ डिसेंबर २०१९ - २०.८
५ डिसेंबर २०२१ - १९.७

Web Title: Hurricane hittng in Pune during winter season; Chance of rain on 7th and 8th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.