कोरोनाच्या धास्तीने " त्यांचे " अन्नदाते रस्त्यावर फिरकेना ; उपाशी पोटी जगणं त्यांचं काही केल्या संपेना..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:06 PM2020-03-25T17:06:03+5:302020-03-25T17:08:05+5:30

मागील काही दिवसांत लोक रस्त्यांवर फिरकेनासे झाल्याने या भटक्या श्वानांना खायला काहीच मिळेनासे झाले आहे.

Horror at Corona did not public into streets | कोरोनाच्या धास्तीने " त्यांचे " अन्नदाते रस्त्यावर फिरकेना ; उपाशी पोटी जगणं त्यांचं काही केल्या संपेना..

कोरोनाच्या धास्तीने " त्यांचे " अन्नदाते रस्त्यावर फिरकेना ; उपाशी पोटी जगणं त्यांचं काही केल्या संपेना..

Next
ठळक मुद्देबहुसंख्य भूकेलेले: कंटेनर मुक्त पुण्यामुळे कचराही नाही तोंड घालायला

पुणे: कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये म्हणून लॉक संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांविषयी संवेदनशील भावना जपत त्यांना खायला टाकणारे माणसे रस्त्यावर फिरायला येणे बंद झाले. त्यात सगळ्यात पंचाईत झाली ती भटक्या श्वानांची. मागील काही दिवसांत लोक रस्त्यांवर फिरकेनासे झाल्याने या भटक्या श्वानांना खायला काहीच मिळेनासे झाले आहे. एरवी साचलेल्या कचर्यात तोंड घालून ते पोट भरत असतात, मात्र कंटेनर मुक्त पुण्यामुळे आता हा कचराही त्यांना मिळेनासा झाला आहे. यातून एखादी नवीच समस्या निर्माण होण्याचा धोका आहे असे काही ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.
दिवसभर कुठेतरी शांतपणे फिरत असणारे हे भटके श्वान रात्री मात्र आक्रमक होतात. कचरा शोधत त्यावरच पोट भरतात. तसेच काही प्राणीप्रेमी व संस्था संघटनांकडून त्यांना खायलाही दिले जाते. आता मात्र त्यांच्या खाण्यावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. दिवसाही कोणी फिरकत नाही व रात्री तर रस्त्यावर माणूसही दिसत नाही, त्यामुळे गल्लीबोळातील ही भटकी कुत्री भलतीच आक्रमक झाली आहेत. मोठ्याने भुंकणे, इवळणे असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. चुकून एखादे कोणी रस्त्यावरून वाहन घेऊन जात असेल तर त्याच्यामागे ही कुत्री लागतात व त्यांना घाबरवून टाकतात.याचा काहीतरी विचार व्हावा असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. 
--------
याश्वानांविषयीचाविचार झाला पाहिजे. आम्ही काही मित्र आमच्या परिसरातील अशा भटक्या श्वानांना खायला देत असतो. तेही जीवच आहेत. त्यांचा विचार व्हावा असे आम्हाला वाटते. त्यांना खायला देण्याची परवानगी मिळावी म्हणून आत्ता आम्ही दत्तवाडी पोलिस ठाण्यात आलो आहोत. घेवारे म्हणून इथे आत्ता वरिष्ठ अधिकारी आहेत. ते आमचे म्हणणे ऐकत आहेत.
सौरभ भोमकर , प्राणी प्रेमी कार्यकर्ता.

Web Title: Horror at Corona did not public into streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.