गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 07:22 PM2019-09-29T19:22:02+5:302019-09-29T19:48:21+5:30

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, अध्यात्माचा सर्वाेच्च बिंदू गाैतम बुद्ध आहेत तर शाैर्याचा सर्वाेच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत.

The highest point of spirituality is Buddha, and the highest point of shaurya is Shivaji and Sambhaji Maharaj | गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज

गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज

googlenewsNext

पुणे : अध्यात्माचा सर्वाेच्च बिंदू गाैतम बुद्ध आहेत तर शाैर्याचा सर्वाेच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत, त्यामुळे गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढेच महत्त्वाचे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. 

पुण्यात एका कार्यक्रमाला ते आले हाेते, त्यावेळी त्यांना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी वरील मत व्यक्त केले. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीत बाेलताना नरेंद्र माेदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भारताने जगाला बुद्ध दिला या केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. जगाचा संसार सुखाने चालविण्यासाठी बुद्ध नव्हे तर संभाजी महाराज हवेत असे वक्तव्य त्यांनी केले हाेते. 

संभाजीराजे म्हणाले, काेण काय बाेलते यापेक्षा माझे मत वेगळे आहे. अध्यात्माचा सर्वोच्च बिंदू गौतम बुद्ध आहेत तर शौर्याचा सर्वोच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत.त्यामुळे जगाचा संसार चालविण्यासाठी गौतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच महत्त्वाचे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत.

उद्यनराजेंच्या प्रचारासाठी जाणार का असे विचारले असता ते म्हणाले, मी आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही याचा अर्थ माझा एखाद्याला विरोध आहे असं होतं नाही.उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे कोणत्याही पक्षात आले तरी माझा त्यांना फुल सपोर्ट आहे.

Web Title: The highest point of spirituality is Buddha, and the highest point of shaurya is Shivaji and Sambhaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.