Rain Alert : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:40 PM2020-10-20T23:40:58+5:302020-10-20T23:43:49+5:30

मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..

Heavy rains begin with thunderstorms in Pune city | Rain Alert : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 

Rain Alert : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 

Next

पुणे शहरात मंगळवारी रात्री उशिरा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कर्वेनगर, वाघोली, चंदननगर, येरवडा, वानवडी, पद्मावती परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात शहरातील काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला.

हवामान विभागाने पुणे शहरात आणखी चार दिवस वृष्टी सांगितली आहे. मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज, खडकवासला, वारजे, कोथरुड मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील हवेतील आर्द्रता कमी होत असून २३ ऑक्टोबरपासून विदर्भातून मॉन्सूनच्या माघारी सुरुवात होण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मॉन्सूनने माघारी गेला असण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, उष्ण हवेमुळे स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.



गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी,कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

२१ ऑक्टोबर रोजी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्घा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains begin with thunderstorms in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.