‘त्याने’ काही फुटांवर पाहिला ‘मृत्यू’; तीनवेळा ट्रिगर दाबूनही गोळी न उडाल्यामुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 11:50 AM2021-01-19T11:50:01+5:302021-01-19T11:53:26+5:30

वानवडीतील घटना, एका पाठोपाठ तीन वेळा पिस्तुलाचा ट्रिगरही दाबून सुदैवाने गोळी उडालीच नाही.

‘He’ saw ‘Death’ a few feet away; The creature survived because it did not fire even after pressing the trigger three times | ‘त्याने’ काही फुटांवर पाहिला ‘मृत्यू’; तीनवेळा ट्रिगर दाबूनही गोळी न उडाल्यामुळे वाचला जीव

‘त्याने’ काही फुटांवर पाहिला ‘मृत्यू’; तीनवेळा ट्रिगर दाबूनही गोळी न उडाल्यामुळे वाचला जीव

googlenewsNext
ठळक मुद्देदोन तरुणींसह पाच जणांना अटक

पुणे : चौकात रात्रीच्या वेळी मुलांसोबत थांबलेल्या एका तरुणीला त्याने तू माँट्याच्या नादी लागू नकोस, असे सांगितले. त्यावर त्याने या तरुणावर पिस्तुल रोखून धरले. तेव्हा त्याला आपला मृत्युच समोर दिसला. त्याने एका पाठोपाठ तीनवेळा ट्रिगर दाबूनही गोळी न उडता त्या पायाजवळ पडल्या. तेव्हा त्याच्यावर कोयत्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ते हल्ले त्याने चुकविले. तेव्हा त्या टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी या टोळीतील पाच जणांना अटक केली.

आकाश संतोष भारती, अनिकेत ऊर्फ माँटी शरद माने (दोघे रा. तरवडेवस्ती, मंहमदवाडी) चेतन पांडुरंग ढेबे (रा. हिंगणे), सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (रा. काळेपडळ, हडपसर), अंबिका अर्जुन मिसाळ (वय २१, रा. तरवडेवस्ती), काजल मधुकर वाडकर (वय २१, रा. वाडकर मळा, महंमदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी नागेश पंढरीनाथ मिसाळ (वय ४२, रा. शेवाळे पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार तरवडेवस्तीतील साठेनगर चौकात १७ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडला. 

नागेश मिसाळ हे ड्रायव्हर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा येथील राहणारे आहेत. मिसाळ हे आई व बहिणीला भेटून घरी जात असताना रात्री दहा वाजता साठेनगर चौकात आले़. तेथे त्यांना इतर मुलांबरोबर अंबिका मिसाळ दिसली. ते अंबिका हिला तु माँट्याच्या नादी लागू नको, असे समजावून सांगत होते. त्यावेळी माँटी ऊर्फ अनिकेत माने याने नागेश याच्या कानाखाली जोरात चापट मारली. त्यानंतर आकाश भारती याने मिसाळला सांगितले की,  तुझा भाऊ गणेश याने  माझ्या मित्र अक्षय याचा मर्डर केला आहे, असे म्हणून त्याने त्याच्याकडील पिस्तुल काढून नागेश याच्यावर रोखले. त्याचा ट्रिगर तीन वेळा दाबला. परंतु, गोळी उडून नागेशला न लागता खालीच पडली. त्यामुळे नागेशचा जीव वाचला. त्यानंतर त्याने पिस्तुलच्या मुठीने नागेश याच्या डोक्यात मारुन जखमी केले. सनी हिवाळे व चेतन ढेबे यांनी तलवार व कोयत्याने मारत असताना नागेश याने त्यांचे वार हुकवले. माँटी याने काठीने मारहाण केली. अंबिका मिसाळ, तिची मैत्रिण काजल वाडकर यांनी नागेशला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानी नागेश याला धमकी देऊन रक्ताने भरलेला शर्ट काढायला लावला. तो शर्ट घेऊन त्या तेथून निघून गेल्या.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. वानवडी पोलिसांनी  अंबिका मिसाळ व काजल वाडकर यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अन्य आरोपी हे चाकणला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यांना चाकणपर्यंत शोध घेऊन अटक केली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, सुदैवाने पिस्तुलातून गोळ्या न उडाल्याने त्याचा जीव वाचला. पोलिसांनी तातडीने हालचाल करुन दोन तरुणींना अगोदर अटक केली. त्यानंतर चाकणपर्यंत माग काढत एकूण ५ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: ‘He’ saw ‘Death’ a few feet away; The creature survived because it did not fire even after pressing the trigger three times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.