hapiness bigger than Tukaram Maharaj and khandoba god darshan: Bachhu Kadu | अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू
अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू

ठळक मुद्देसासवड नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीचे वाटप

सासवड :  अंगात जीव आहे तोपर्यंत गरीब, अपंग व्यक्तींसाठी प्रशासनाबरोबर भांडतच राहणार..सामान्य जनतेसाठी प्रशासनाबरोबर भांडणे हा आमचा स्वभाव असल्यानेच कोणत्याही राजकीय पक्षात गेलो नाही. कारण एखाद्या पक्षात गेल्यावर राजकीय नेत्यांची गुलामी करावी लागते. काम झाल्याने राज्यातील अपंग बांधव ज्यावेळी माझ्याकडे येतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो, तो आनंद खंडेराय आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो, असे प्रतिपादन अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

 सासवड ( ता. पुरंदर ) येथील आचार्य अत्रे भवनमध्ये १०३ दिव्यांग व्यक्तींना आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते १५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. सासवडला प्रथमच दिव्यांग, अपंग, बांधवांच्या समस्यांसाठी न भांडता त्यांना सासवड नगरपरिषदेने निधीची तरतूद करून तसेच सोयी सवलती चे लाभ कडू यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. कडू म्हणाले , सासवडला प्रथमच दिव्यांग, अपंग, बांधवांच्या समस्यांसाठी न भांडता त्यांना सासवड नगरपरिषदेने निधीची तरतूद करून तसेच सोई सवलतीचे लाभ माझे हस्ते देण्यात आले. हीच समाजातील दीन दुबळ्यांची गुलामी केल्यास ईश्वर सेवेपेक्षा ती मोठी आहे. अपंग व्यक्तींसाठी कुणीही काहीच करीत नव्हते म्हणून राज्यभर आंदोलने करावी लागली. आणि आता राज्यातील गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी निधीवाटपसाठी घेतलेला पुढाकार आणि आनंदाची गोष्ट असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

सासवड नगरपालिका आणि प्रहार अपंग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मनसेचे राज्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष संजय जगताप, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्चिम विभाग प्रमुख धर्मेंद्र सातव, नगरसेवक विजयराव वढणे, सुहास लांडगे, मनोहर जगताप, अयिा प्रसंगी दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्यवसायासाठी गाळ्याची चावी तसेच सासवड मधील महिला बचत गटांना रोख रकमेचे धनादेश देण्यात आले.
————————————————————————————————————
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, मी स्वत: अपंग नसलो तरीही प्रहार संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल असे सांगून समाजातील अपंग बांधवाना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
———————
सुरेखा ढवळे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव.....
 स्वत: अपंग असताना आणि कोणाचाही आधार नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अपंग बांधवाना बरोबर घेवून सुरेखा ढवळे यांनी राज्यभर आंदोलने केली आणि कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप करण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात सुरेखा ढवळे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, स्वत:ला खुर्ची मिळावी, जमीन, घर मिळावे, पैसे मिळावे यासाठी भांडणारे अनेक पहिले. परंतु, स्वत: अपंग असताना इतर अपंगांसाठी शासनाबरोबर भांडणारी सुरेखा ढवळे या एकमेव आहेत. 

 


Web Title: hapiness bigger than Tukaram Maharaj and khandoba god darshan: Bachhu Kadu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.