पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:44 PM2020-08-03T16:44:44+5:302020-08-03T16:45:11+5:30

१५ जुलै ते २१ जुलै दरम्यान रुग्णवाढ सर्वत्र कमी....

The growth rate of patients has slowed down in most of the field offices in Pune city | पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला

पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला

Next
ठळक मुद्देजुलैच्या शेवटच्या आठवड्यात सर्वच क्षेत्रिय कार्यालयांमध्ये रूग्णवाढीचा वेग कमी

पुणे : शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान असलेला रूग्णवाढीचा वेग शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय वगळता सर्वत्र कमी झाला आहे. तर शहरातील मध्यवर्ती भागात होणारी कोरोनाबाधितांची वाढ या काळात बहुतांशी प्रमाणात आटोक्यात आली असली तरी, नगररोड-वडगावशेरी, कोथरूड-बावधान, धनवकडी-बावधान, वारजे-कर्वेनगर, औध-बाणेर येथील रूग्णवाढीत मात्र फारसा फरक पडलेला नाही. 

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन, होणारा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शहरात १४ ते २३ जुलैपर्यंत दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहिर केला होता. या काळात प्रामुख्याने संसर्ग रोखणे व अधिकाधिक संशयित व्यक्तींना व कोरोनबाधितांना इतरांपासून विलग करण्याचे काम करण्यात आले. यामुळे या काळात नित्याने रूग्णवाढ ही शेकडोने वाढतच असल्याचे दिसून आले. परंतु, यानंतर मात्र कोरोनाबाधितांच्या वाढीपेक्षा कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांचा आकडा हा जास्तीचा आढळून आला. 

 स्मार्ट सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात १५ जुलै ते २१ जुलै या दरम्यान शहरातील पंधरा क्षेत्रिय कार्यालयांर्तगत येणाऱ्या भागांतील रूग्णवाढ व कडक लॉकडाऊन संपल्यानंतरच्या आठवड्यातील (जुलैच्या शेवटच्या आठवड्यातील रूग्णवाढ) रूग्णवाढ हा फरक आपल्या निदर्शनास आणून देतो़ 

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सर्वच क्षेत्रिय कार्यालयांमध्ये रूग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरी, याला अपवाद शिवाजीनगर - घोलेरोड कार्यालय ठरले असून, १५ ते २१ जुलै दरम्यान या भागात १२. ४ टक्के रूग्णवाढीचा वेग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दुप्पटीवर म्हणजेच २४.६ टक्क्यांवर गेला आहे़ तर येवरडा-कळस-धानोरी याठिकाणीही २०.५ टक्के असलेला रूग्णवाढीचा दर हा २८.३ टक्क्यांवर गेला आहे़ 

-----------------------

शहरातील अन्य क्षेत्रिय कार्यालयांमधील लॉकडाऊनमधील व लॉकडाऊननंतरची रूग्णवाढीची टक्केवारी 

 क्षेत्रिय कार्यालय रूग्णदरवाढ दर १५ ते २१ जुलै रूग्णवाढ दर २२ जुलैनंतर 

नगररोड-वडगावशेरी ५३.८ % ५०.९ %

कोथरूड-बावधान ४९.० % ३७.६ %

धनकवडी - सहकारनगर ४३.२ % ३७.५ %

वारजे - कर्वेनगर ४२.८ % ३२.८ %

बिबवेवाडी ४३.८ % २९.१ %

औध-बाणेर ४३.२ % २८.७ %

हडपसर - मुंढवा ३७.७ % ३३.९ %

कोंढवा - येवलेवाडी ३७.२ % ३०.५ %

सिंहगड रोड ३१.५ % २९.४ %

कसबा - विश्रामबागवाडा २९.७ % २४.५ %

येरवडा -कळस-धानोरी २०.५ % २८.३ %

भवानी पेठ २६.६ % २०.७ %

वानवडी-रामटेकडी २४.६ % १६.४ %

शिवाजीनगर-घोलेरोड १२.४ % २४.६ %

ढोले पाटील रोड १५.४ % १३.० %

-----------------------------------------

Web Title: The growth rate of patients has slowed down in most of the field offices in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.