पुराच्या पाण्यात आजी अन् नात गेली वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:17 PM2019-09-26T15:17:13+5:302019-09-26T15:18:42+5:30

ओढ्याच्या पाण्यात आजी आणि नातीचा वाहून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर येथे घडली आहे.

grandmother and girl went missing in flood | पुराच्या पाण्यात आजी अन् नात गेली वाहून

पुराच्या पाण्यात आजी अन् नात गेली वाहून

Next

जेजुरी : जिल्ह्यात हाेत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे गजराबाई सुदाम खोमणे (वय ७५) आणि छकुली अनंता खोमणे वय ( 22) या दोघी  पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .

पुण्याहून एनडीआरएफची टीम सासवड येथे आली असून वटेश्वर मंदिर ते संगमेश्वर मंदिर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. भिवडी येथील ओढ्यालागत खोमणे कुटुंबीय राहत होते. अचानकपने पाण्याचा लोंढा आल्याने संपूर्ण घराला पाण्याने वेढा घातला होता. बाहेर पडताना त्या पुरात वाहून घेल्याचे सांगण्यात आले. काल रात्री भिवडी परिसरात अतिवृष्टी झाल्याने येथील ओढ्याला मोठा पूर आला होता. 

 

Web Title: grandmother and girl went missing in flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.