भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 02:44 PM2021-08-13T14:44:50+5:302021-08-13T14:44:58+5:30

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय

Government of India stop promise; Strong criticism of Cyrus Punawala | भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका

भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका

googlenewsNext
ठळक मुद्देमहिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे. अशी जोरदार टीका सायरस पुनावाला यांनी सरकावर केली आहे. 

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे.  कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील १७० देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत. असेही ते म्हणाले आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. सायरस पुनावाला यांना टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 

कॉकटेल लसींच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, मी कॉकटेल लसीच्या विरोधात आहे. पण आताच्या लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते. बुस्टर डोसची गरज पडेल. त्यासाठी मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे. कोव्हीशिल्डच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर हवे. कोरोना झालेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याबाबत मोदी सरकारचे उत्तर आले नाही 

मी सरकारला सांगितले की पुण्याला जास्त लस द्या कारण पुण्यात जास्त कोरोना आहे..पण ते माझे एकत नाहीत.पुण्यात जास्त कोरोना, इथे लस द्याव्या असा आमचा विचार होता. मात्र, मोदी सरकारने उत्तर दिले नाही. 

 

Web Title: Government of India stop promise; Strong criticism of Cyrus Punawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.