भारत सरकारतर्फे प्रा. किरणकुमार जोहरे यांची विशेष प्रशिक्षणासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 07:14 PM2021-02-12T19:14:21+5:302021-02-12T19:20:13+5:30

प्रा. किरणकुमार जोहरे हे शेती, हवामान आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कसा करता येईल याबाबत कृतीशिल कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

Government of India Pvt. Selection of Kiran Kumar Johare for special training | भारत सरकारतर्फे प्रा. किरणकुमार जोहरे यांची विशेष प्रशिक्षणासाठी निवड

भारत सरकारतर्फे प्रा. किरणकुमार जोहरे यांची विशेष प्रशिक्षणासाठी निवड

googlenewsNext

पुणे: भौतिकशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ, कृषी आणि तंत्रज्ञान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांची भारत सरकारतर्फे एका विशेष राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर केवळ २५ व्यक्तींचा सहभाग असलेल्या यामध्ये महाराष्ट्रातून केवळ प्रा. जोहरे यांची निवड दिल्लीहून करण्यात आली आहे. या विशेष प्रशिक्षणासाठी ते गुजरातला रवाना झाले आहेत.

प्रा. किरणकुमार जोहरे हे शेती, हवामान आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कसा करता येईल याबाबत कृतीशिल कार्यक्रमात सहभागी होत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांती होत असताना नैसर्गिक बुद्धीमत्ता आणि साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोगाबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निग (एमएल), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदल तसेच मान्सून व चक्रीवादळांचा बदललेला पॅटर्न लक्षात घेत व देशी बी-बियाणे वापरत, नैसर्गिक पद्धतीने शेतीसाठी विविध प्रयोग जोहरे करत आले आहेत. मातीतील ऑरगॅनिक कार्बन (सेंद्रिय कर्ब) वाढवत असताना विषमुक्त सकस अन्न निर्मिती व अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण संतुलन चक्रात गाईचे महत्व यांद्वारे कृतीशील आराखडा बनविण्यासाठी देखील प्रा किरणकुमार जोहरे अभ्यास करत आहेत.

सध्या प्रा.किरणकुमार जोहरे हे पुणे विद्यापीठात डॉ. ए. डी. शालिग्राम व के. व्हि. एन. नाईन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. जी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या साहाय्याने अ‍ॅटोमेशन विषयी पीएचडी करत असून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सटाणा (नाशिक) वरीष्ठ महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक व कम्प्यूटर सायन्स विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

Web Title: Government of India Pvt. Selection of Kiran Kumar Johare for special training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.