आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून निघून गेला; लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनी शोधून काढला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:45 PM2021-09-02T21:45:16+5:302021-09-02T21:45:35+5:30

मध्य प्रदेशातील नातेवाईकांकडे हवाली 

Gone to do something big in life; After 13 years, the railway was discovered by the police | आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून निघून गेला; लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनी शोधून काढला 

आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून निघून गेला; लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनी शोधून काढला 

Next

पुणे : जीवनात काही तरी भव्य करुन दाखवायचे असे त्याचे स्वप्न होते. नातेवाईकांबरोबर झेलम एक्सप्रेसमधून जात असताना तो पुणेरेल्वे स्थानकावर उतरला व नातेवाईकांना सोडून निघून गेला. त्यानंतर तब्बल १३ वर्षे गेली. आता लोहमार्ग पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत हा तरुण सुरतमध्ये काम करीत असल्याचे आढळून आले. तब्बल १३ वर्षांनी दोघे भाऊ एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले.

गणेश मन्नुलाल यादव (वय २६, रा. हिनोतीया भोई, ता. बरेला, जि. जबलपूर, मध्य प्रदेश) असे या बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. आता तो ३९ वर्षाचा झाला आहे. 
गणेश यादव यांची घरची गरीबी आहे. तो भावाबरोबर ८ एप्रिल २००८ रोजी झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना पुणे रेल्वे स्थानकावर उतरुन बेपत्ता झाला. त्याचा भाऊ सुशिलकुमार यादव याने रेल्वे पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. गणेश यादव याला जीवनात काही तरी मोठे करुन दाखवायचे होते. त्यामुळे तो निघून गेला होता. घरची गरीबी आणि अल्प शिक्षण यामुळे त्याने बाळगलेले स्वप्न पूर्ण करु शकला नव्हता. त्यामुळे त्याने घरच्यांशी संपर्क साधला नव्हता.

रेल्वे पोलिसांकडे मिसिंगचे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या आदेशानुसार त्यासाठी एक पथक नेमण्यात आले. या पथकाने शोध घेतला असता गणेश यादव हा सुरत येथील आर्यन मित्तल ॲन्ड निप्पो स्टील प्लाँट कन्वहेअर या कंपनीत काम करीत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भावाशी संपर्क करुन ही माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी दोघेही भाऊ पुणे रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलीस ठाण्यात एकमेकांना तब्बल १३ वर्षांनी भेटले.

पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दीपक काळे, हवालदार गजानन केंगार, पोलीस अंमलदार उदय चिले, संजीव हासे यांनी ही कामगिरी केली.

....

मोबाईल, बँक खात्यावरुन पटली ओळख

गणेश यादव हे १३ वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यादरम्यान, त्यांच्यात बराच बदल झाला होता. पोलीस पथकाला तांत्रिक विश्लेषणावरुन एक मोबाईल नंबर मिळाला होता. तसेच त्यांच्या बँक खात्यावरुन खात्री पटविण्यात आली. गणेश यादव यांनाही घराची ओढ लागली होती. त्यामुळेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी घरी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.
 - मौला सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पुणे

Web Title: Gone to do something big in life; After 13 years, the railway was discovered by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.