चित्रपट रसिकांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात 'ऑनलाइन चित्रपट रसास्वाद' शिबिराचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 03:13 PM2020-09-29T15:13:44+5:302020-09-29T15:16:44+5:30

साहित्य आणि चित्रपट, चित्रपटाचे जतन, प्रेक्षक चळवळीची आवश्यकता, चित्रपटाचे प्रकार अशा अनेक विषयांभोवती चर्चा व मार्गदर्शन..

Golden opportunity to film lover ; Organizing an online Film Appreciation camp in Pune | चित्रपट रसिकांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात 'ऑनलाइन चित्रपट रसास्वाद' शिबिराचे आयोजन

चित्रपट रसिकांसाठी सुवर्णसंधी ; पुण्यात 'ऑनलाइन चित्रपट रसास्वाद' शिबिराचे आयोजन

Next
ठळक मुद्देचित्रपट माध्यमाचे व्यामिश्र स्वरूप व त्याच्या शक्‍यता, चित्रपट भाषेची उकल यावरील व्याख्यानांचा समावेश

पुणे : चित्रपट पाहण्याचे एक कौशल्य असते. त्या चित्रपटाची रचना, त्या चित्रपटाचे आस्थाविषय समजून घेऊन ते शोधायला लागतात. एखादा विषय दीर्घकाळ स्मरणात का राहतो ? हे पटकन सांगता येत नाही. त्यासाठी तो चित्रपट त्याचे तंत्र, रचना, कलात्मकता समजून घ्यावी लागते. यातून चित्रपट रसास्वादाचे महत्व अधोरेखित होते.याच जाणिवेतूनच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय” व “फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया” यांनी सुजाण चित्ररसिक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन “रसास्वाद सिनेमाचा हे ऑनलाईन शिबिर १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित केले आहे.
    मराठी भाषेतून चालणारा हा एकमेव उपक्रम आहे.  यंदा 'कोविड १९ कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या प्राप्त परिस्थितीत हे शिबिर ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. सत्यजीत राय यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पं रावे शिबिर आयोजित केले जात आहे.
     चित्रपट माध्यमाचे व्यामिश्र स्वरूप व त्याच्या शक्‍यता, चित्रपट भाषेची उकल यावरील व्याख्यानांचा या शिबिरात समावेश आहे. याशिवाय चित्रपटाचा इतिहास व जागतिक सिनेमातील नव्या वाटा याबद्दलचे व्याख्यानही या शिबिरात होणार आहे. भारतीय सिनेमाला आकार देणाऱ्या “नवसिनेमाची” वाटचाल तसेच “मराठी सिनेमाचा” इतिहास दृश्यफितीद्वारे दाखविला जाणार असून, लोकप्रिय' सिनेमाची या शिबिरात चर्चा केली जाणार आहे. चित्रपटातील दृश्यात्मकता, चित्रपटातील संगीताची परिणामकारकता विशद करणारी व्याख्याने, चित्रपट माध्यमाचे स्वरूप, त्याची रचना याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. याशिवाय साहित्य आणि चित्रपट, चित्रपटाचे जतन, प्रेक्षक चळवळीची आवश्यकता, चित्रपटाचे प्रकार अशा अनेक विषयांभोवती चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात डॉ. मोहन आगाशे, समर नखाते, दीपक देवधर, सुहास किर्लोस्कर, अभिजीत देशपांडे, अनुपम बर्वे, उमेश कुलकर्णी, श्यामला वनारसे, सुषमा दातार, गणेश मतकरी, उज्वल निरगुडकर, अभिजीत रणदिवे, राहुल रानडे, सुधीर नांदगावकर व प्रकाश मगदूम असे अनेक तज्ज्ञ विश्लेषक व्याख्यान देणार आहेत. शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार आहेत. तसेच तांत्रिक समन्वयक सुहास किर्लोस्कर आहेत.
या शिबिरात शिबिरार्थींना ७ ते ८ चित्रपट व काही लघु चित्रपट शेयर ड्राइव्हवर उपलब्ध करून दिले जातील. शेयर ड्राइव्हवरून चित्रपट डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असणारी डिस्क स्पेस (किमान २ जीबी) आपल्या डेस्कटॉप/ लॅपटॉपवर असणे गरजेचे आहे. या शिबिरासाठी १८ वर्षांवरील इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश अर्ज पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Www.nfai.gov.in या संकेतस्थळावरील नमुना प्रवेश अर्ज डाऊनलोड करुन भरावा. 

Web Title: Golden opportunity to film lover ; Organizing an online Film Appreciation camp in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.