टीव्ही मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 11:35 AM2020-03-15T11:35:57+5:302020-03-15T11:36:10+5:30

याप्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

gang rape on young woman for pretending to work in TV series | टीव्ही मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार

टीव्ही मालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक बलात्कार

Next

पुणे : टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईतील तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर दोघांनी बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणून एका तरुणीनेच या तरुणीला काम मिळवून देते, असे सांगून त्यांच्याशी निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन दिली. त्यांनीच तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना विमाननगरमधील हॉटेल एच एच आयमध्ये ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया नावाच्या एका महिलेने या तरुणीला तिच्या ओळखीच्या निर्माता व दिग्दर्शकांकडून टीव्ही मालिकामध्ये काम मिळवून देते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने विश्वास ठेवला. त्यानंतर तिला घेऊन छाया कॅबने मुंबईहून पुण्यात आली.

विमाननगर येथील एच. एच. आय हॉटेलमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली. नागपूर येथील दोघांची तिने निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन दिली. तिच्या खोलीमध्ये त्यांनी मध्यरात्रीपर्यंत मद्यपान केले. त्यानंतर त्यांनी या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार देताच छाया हिने तिच्या हातातील बीयरची बाटली या तरुणीच्या हातावर मारुन तिला जखमी केले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. विमानतळ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून नागपूरच्या निर्माता, दिग्दर्शकांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत.

Web Title: gang rape on young woman for pretending to work in TV series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.